होम लोन घ्याव कि नाही ? घेतलं तर किती घ्यावं आणि ते फेडण्याची घाई करावी की नाही यावर नेहमीच साधक-बाधक चर्चा ऐकायला मिळते. यावर ऑफिसमधे लंच-टेबलवर एक चर्चा झाली, त्यातले काही मुद्दे इथे देतोय, अजूनही एक कळत नाही आमच गणित चुकतय कुठं ?
१. घरासाठी कर्ज :
जर १२०० रूपये किमतीचं घर विकत घेण्यासाठी २० वर्षासाठी ११% व्याजदराने १००० रूपये कर्ज घेतलं, तर दरमहा रू. १०.३२ इतका हप्ता पडतो. म्हणजेच २० वर्षात बॅन्केला २४७७.२५ रूपये दिले जातात. या रकमेमधे जर व्याजदरातील बदल, प्रोसेसिंग फिज आदी गोष्टी मिळवल्या तर हा आकडा २५५० च्या आसपास जातो.
२. टॅक्स बेनिफिट :
लोन घेण्यामागे आणखीएक फायदा सांगितला जातो तो म्हणजे ‘वाचणारा इन्कम टॅक्स’. खरोखर टॅक्स वाचतअसेल तर तो मुद्दलावर, कारण जे पैसे बॅकेच्या खिशात गेले त्यावर आपला टॅक्स वाचला अस म्हणणं मला तरी पटत नाही. :) जर तुम्ही टोटल २०% च्या टप्प्यात येत असाल तर २० वर्षात कर्जाच्या मुद्दलावर रूपये २००/- इतका टॅक्स वाचला. हे थोड अवघड गणित आहे, कदाचित पटणारही नाही.
३. प्रॉपर्टीची किंमत :
ह्या सर्व गणितात २० वर्षात तुमच्या प्रॉपर्टीची किंमत किती होते हा महत्वाचा भाग आहे, जर तुम्ही अंडर-डेव्हलपड किंवा डेव्हलपिंग ठिकाणी घेतली असेल तर ठिक पण फुल्ली डेव्हलप्ड् थिकाणि असेल तर किंमतीतला चढ कमी असावा. पुण्याच्या २००१-२०१० दरम्यानचा किंमतीतला चढ हा २०१०-२०२० मधे कायम राहिल याची शाश्वती नाही, उलट सब-प्राईम सारख प्रकरण उद्भवलं तर या किंमती खालीही जाऊ शकतात. :(
वरील गणितात एक सिद्ध होतं कि तुम्हाला २० वर्षासाठी दर महिना १०.३२ इतका हप्ता देता येतो. मग तोच जर दरमहा गुंतवत गेलात तर ?
१. ९% व्याजदराने, त्रैमासिक चक्रवाढीने २० वर्षात रू. ६८८५.३९ होतील.
२. १२% व्याजदराने, त्रैमासिक चक्रवाढीने २० वर्षात रू. १०,१४७.७३ होतील
३. १५% व्याजदराने, त्रैमासिक चक्रवाढीने २० वर्षात रू. १५२४१.७२ होतील
आणि तिनही प्रकारत समान गुंतवणुक केली तर सरासरी १०,७५८ होतील.
जर वरील मुद्दा क्रमांक ३ मधे दिलेल्या प्रोपर्टीची किंमत १० पट होणार नसेल तर ती लोन काढून विकत का घ्यावी ? तेच पैसे योग्य गुंतवणुक करत गेले तर काही वर्षात लोनशिवाय प्रॉपर्टी विकत घेता येणं शक्य नाही काय ? तुमच काय मत आहे ?
लोन आणि गुंतवणीची गणित खालील दुवे वापरून केलीआहेत :
http://www.amortization-calc.com
http://www.etechplanet.com/tools/rd-interest-calculator.aspx




