… मूर्त पेक्षा अमूर्त रंग-रेषा ही तेवढाच आनंद देतात. चित्र काढताना बाकिचं सगळ विसरलं जातं, रंग-रेषा-मिकचा कागद .. आणि आनंदच आनंद .. एक रंगित मेडिटेशन ! खरच काय बरं संबंध आहे वृत्तींचा आणि रंगांचा ? वृत्तींना रंग असतो का ? रंगाच्या वृत्ती असतात का ? मनाच्या बहिर्मुखतेला अंतरंगात डोकवायला लावायच सामर्थ्य रंगात आहे, म्हणून तर [...]
कोमल आवाजाचा साज चढण्यापूर्वी आणि जगरहाटीच्या गोंधळातून कामनेचा वारा अंगाला झोंबण्यापूर्वी, गमतीगमतीत सुरावट लावून जी बडबड होते, त्यालाच म्हणतात बडबडगीत ! कदाचित सगळ्याच्या अगदी अलिकडे किंवा पलिकडे … असच एक बडबडगीत ..
काल वही वाचताना एका अर्ध्या लिहिलेल्या पानापाशी येऊन थांबलो,
गेल्यावर्षी कधीतरी लिहिलेला अर्धवट ‘प्लोग’ आहे, पण तरीसुद्धा अर्धवट शेअर करतोय,
कारण ‘ काही काही गोष्टी अर्धवट राहण्यात खरी गम्मत असते’ हो, ना ?
.. क्रिएटिविटीचं तसाच आहे, अन प्रेमाचंही !
सोमवार सकाळ म्हणजे प्रत्येक सॉफ्टवेअर इंजिनिअरसाठी जिवघेणा प्रकार वाटतो, सुरूवातच मुळी होती शुक्रवारी संध्याकाळी अमेरिकन, युरोपीअन क्लायंटने पाठवलेल्या ईमेल्सने ! नंतर साप्ताहिकी .. म्हणजे विकली मिंटींग.या मिंटींगमधे मुख्यत्वाने मागिल आठवड्याचा आढावा घेणे आणि या आठवड्यासाठी नियोजन करून काम करणे हा उद्देश असतो.मिटींगमधे मागिल आठवड्यात केलेल्या कामाची उजळणी, ते करताना आलेले इश्यूज, एखाद्या टास्कला विलंब झाला [...]
रेडहॅट ७.२ हे पहिलं लिनक्स (माझ्यासाठी पहिलं) शिरीष सरांनी सासवडला माझ्या घरी येऊन मशिनवर टाकलं तेव्हा ते वापरताना मला आभळ ठेंगणं झालं होतं. त्यावेळी माझं जग डॉसचा काळापांढरा स्क्रीन आणि विन्डोज-९८ याभोवतीच रेंगाळत होतं. मिलेनियम आणि २००० ही चैन होती, गावात क्वचीत कुणाकडे तरी ती पहायला मिळायची. ( हो, विन्डोज मिलेनियम नावाची ओएस [...]