• लव्ह मॅरेज ::‌ आणि एक प्रॉब्लेम !

    सोबतच्या चित्रामधे एका लव्ह स्टोरीचा रोडमॅप दाखवलेला आहे. चित्र बऱ्यापैकी सेल्फ एक्सप्लेनेटरी आहे. चित्रात दाखवलेल्या दोघांना एकमेकांशी‌ विवाहबद्ध व्हायच आहे, परंतु शेवटच्या स्टॉपवर मुलीच्या वडिलांनी लाल झेन्डा दाखवलाय, त्यांच्यामते तो दुसऱ्या जातितला असल्याने त्यांना तो चालणार नाही, आणि तरीही तिने त्याच्याशी‌लग्न केल्यास ‘ते स्वत:चं काहिही’ करू‌ शकतात, अशी धमकीदेखील दिलीय. बिचारे बरेच चिंतेत आहेत, या [...]

  • मी माझा धर्म बदलू का ?

    दोन वर्ष अमेरिकेत रहात असताना ज्या गोष्टिचा मला विसर पडला होता तो प्रश्न परत डोकं काढायला लागलाय .. माझी जात ! माझ्या वैयक्तित आयुष्यात घडत असणाऱ्या घटनांमधे काही लोकांचे स्टॅन्ड पहाता ‘जात’ शब्दामुळंच मी (आणि ‘ती’ सुद्धा) सध्यातरी प्रचंड वैतागलो आहे, अर्थात जात आणि धर्म यावर बौद्धिक करण्याइतका मी मोठा नसलो तरी असलेल्या सिस्टमचा आणि [...]

  • नैराश्य :: माझा पर्सनल डिझास्टर रिकव्हरी प्लॅन

    डिझास्टर मॅनेजमेन्ट हा कोणत्याही व्यवसायाचा अविभाज्य घटक झालेला आहे, त्या अनुषंगाने कंपन्यांच्या डिझास्टर मॅनेजमेन्ट पॉलिसीज देखील असतात, यामधे भूकंप, आग आदी‌ संकट आल्यास कंपनीचे नुकसान कसे टाळता येईल व व्यवसाय कसा सुरू राहिल अशी मार्गदर्शक तत्व असतात व त्यानुसार संकटातदेखील तग धरता येते. जर कंपनीचा असा प्लॅन असतो तर आपल्या स्वत:साठी का नाही ? मनाला [...]

  • इंडियन की चायनिज ?

    गेले आठवडा मनात सुरू असलेल्या एका द्वंद्वाची‌ कालपर्वा समाप्ती‌ झाली पण सल काही अजून गेली नाही, म्हणून ही आजची‌ पोस्ट. मागील आठवड्यात मराठी मंडळीवर एका चर्चेला सुरूवात झाली, संदर्भ होता ‘भारतीय सौर दिनदर्शिका’. जसा आपला राष्ट्रीय खेळ हॉकी आहे, पक्षी‌ मोर आहे, गीत – जन-गण-मन आहे, तशीच ही‌ आपली राष्ट्रीय दिनदर्शिका. २२ मार्चला आपल्या या [...]

  • मराठीभाषा :: गळचेपीची कारणं !

    आपली भाषा अस्थिर होतेय, आपल्या भाषेला बाकिचे दुय्यम लेखतायत, आपल्या भाषेची (आणि भाषिकांचीही) गळचेपी होतेय .. असे एक ना अनेक सूर आज आपल्याला ऐकायला मिळतायत, कदाचित तुम्हीही हेच रडगाणं गात असाल. सांखिकीच्या, सामाजिक मान्सशास्त्राच्या, इतिहासाच्या किंवा राजकारणाच्या दृष्टिकोनातून काय सत्य आहे हे पडताळण्याची गरज असेलही‌, पण एक मात्र नक्की … हे सगळे गळे मराठी बोलणारेच [...]