• मी माझा धर्म बदलू का ?

    दोन वर्ष अमेरिकेत रहात असताना ज्या गोष्टिचा मला विसर पडला होता तो प्रश्न परत डोकं काढायला लागलाय .. माझी जात ! माझ्या वैयक्तित आयुष्यात घडत असणाऱ्या घटनांमधे काही लोकांचे स्टॅन्ड पहाता ‘जात’ शब्दामुळंच मी (आणि ‘ती’ सुद्धा) सध्यातरी प्रचंड वैतागलो आहे, अर्थात जात आणि धर्म यावर बौद्धिक करण्याइतका मी मोठा नसलो तरी असलेल्या सिस्टमचा आणि [...]

  • नैराश्य :: माझा पर्सनल डिझास्टर रिकव्हरी प्लॅन

    डिझास्टर मॅनेजमेन्ट हा कोणत्याही व्यवसायाचा अविभाज्य घटक झालेला आहे, त्या अनुषंगाने कंपन्यांच्या डिझास्टर मॅनेजमेन्ट पॉलिसीज देखील असतात, यामधे भूकंप, आग आदी‌ संकट आल्यास कंपनीचे नुकसान कसे टाळता येईल व व्यवसाय कसा सुरू राहिल अशी मार्गदर्शक तत्व असतात व त्यानुसार संकटातदेखील तग धरता येते. जर कंपनीचा असा प्लॅन असतो तर आपल्या स्वत:साठी का नाही ? मनाला [...]

  • नविन सौर वर्ष :: स्प्रिंग रिसॉलूशन्स !

    आजपासून सुरू‌ होत असलेल्या नविन सौर वर्षाच्या शुभेच्छा, हे नविन वर्ष १९३२ आपणा सर्वांना सुखासमृद्धीचे आनंदाचे आणि भरभराटीचे जावो, ही‌ प्रार्थना. आज याच मुहूर्तावर मी माझ्या वहित काढलेला या स्प्रिंग-सिझनचा रिसॉल्यूशन मॅप टाकतोय, हा वसंत ऋतू माझ्या अमेरिकेतल्या यावेळच्या वास्तव्यातला बहुधा शेवटचा असल्याने मी‌ यावेळी‌ भरपूर एक्साईटेड आहे, हे सांगायलाच नको.
    चित्रात दाखवल्याप्रमाणे येत्या तीन महिन्यात [...]

  • मराठीभाषा :: गळचेपीची कारणं !

    आपली भाषा अस्थिर होतेय, आपल्या भाषेला बाकिचे दुय्यम लेखतायत, आपल्या भाषेची (आणि भाषिकांचीही) गळचेपी होतेय .. असे एक ना अनेक सूर आज आपल्याला ऐकायला मिळतायत, कदाचित तुम्हीही हेच रडगाणं गात असाल. सांखिकीच्या, सामाजिक मान्सशास्त्राच्या, इतिहासाच्या किंवा राजकारणाच्या दृष्टिकोनातून काय सत्य आहे हे पडताळण्याची गरज असेलही‌, पण एक मात्र नक्की … हे सगळे गळे मराठी बोलणारेच [...]

  • मराठीभाषा :: प्रश्नांचा माईंडमॅप

    मराठी दिनानिमित्त मनामधे जे काही‌ चाललं होतं त्याला आज बत्ती‌ लागली. बोलण्याच्या ओघात एकाने री ओढली‌ आणि राजकारण्यांमुळे मराठी भाषेचं कसं खच्चीकरण होतय यावर एक झकास भाषण दिलं. केवळ राजकारण हे कोणत्याही‌ भाषेच्या प्रगतीला जर कारण होऊ शकत नसेल तर ते अधोगतीलाही‌ नसले पाहिजे असं माझं मत आहे, .. त्या भाषेमधे जर अर्थकारण होत नसेल, [...]