“मे आय स्पिक तू ‘समेश बारटक’, आय ऍम कॉलिंग ऑन बिहाल्फ ऑफ HSBC …?”
सकाळी सकाळी ०११४७९७४४xx या क्रमांकावरून फोन आला आणि फडाफड इंग्रजी झाडलं गेलं.
“येस, थिस इज सोमेश स्पिकिंग”, मी उत्तरलो.
“वुई हॅव .. “, मी सोमेशच बोलतोय हे समजल्यावर समोरच्या व्यक्तीने पुढिल माहिती सांगायला सुरूवात केली, त्याला तिथेच थांबवून एक विनंती केली :
“तुम्ही [...]
आपली भाषा अस्थिर होतेय, आपल्या भाषेला बाकिचे दुय्यम लेखतायत, आपल्या भाषेची (आणि भाषिकांचीही) गळचेपी होतेय .. असे एक ना अनेक सूर आज आपल्याला ऐकायला मिळतायत, कदाचित तुम्हीही हेच रडगाणं गात असाल. सांखिकीच्या, सामाजिक मान्सशास्त्राच्या, इतिहासाच्या किंवा राजकारणाच्या दृष्टिकोनातून काय सत्य आहे हे पडताळण्याची गरज असेलही, पण एक मात्र नक्की … हे सगळे गळे मराठी बोलणारेच [...]
मराठी दिनानिमित्त मनामधे जे काही चाललं होतं त्याला आज बत्ती लागली. बोलण्याच्या ओघात एकाने री ओढली आणि राजकारण्यांमुळे मराठी भाषेचं कसं खच्चीकरण होतय यावर एक झकास भाषण दिलं. केवळ राजकारण हे कोणत्याही भाषेच्या प्रगतीला जर कारण होऊ शकत नसेल तर ते अधोगतीलाही नसले पाहिजे असं माझं मत आहे, .. त्या भाषेमधे जर अर्थकारण होत नसेल, [...]