दोन वर्ष अमेरिकेत रहात असताना ज्या गोष्टिचा मला विसर पडला होता तो प्रश्न परत डोकं काढायला लागलाय .. माझी जात ! माझ्या वैयक्तित आयुष्यात घडत असणाऱ्या घटनांमधे काही लोकांचे स्टॅन्ड पहाता ‘जात’ शब्दामुळंच मी (आणि ‘ती’ सुद्धा) सध्यातरी प्रचंड वैतागलो आहे, अर्थात जात आणि धर्म यावर बौद्धिक करण्याइतका मी मोठा नसलो तरी असलेल्या सिस्टमचा आणि [...]
गेले आठवडा मनात सुरू असलेल्या एका द्वंद्वाची कालपर्वा समाप्ती झाली पण सल काही अजून गेली नाही, म्हणून ही आजची पोस्ट. मागील आठवड्यात मराठी मंडळीवर एका चर्चेला सुरूवात झाली, संदर्भ होता ‘भारतीय सौर दिनदर्शिका’. जसा आपला राष्ट्रीय खेळ हॉकी आहे, पक्षी मोर आहे, गीत – जन-गण-मन आहे, तशीच ही आपली राष्ट्रीय दिनदर्शिका. २२ मार्चला आपल्या या [...]
विकएन्डला स्वच्छ सूर्यप्रकाश पडला होता आणि तापमान १-२ च्या आसपास होत, म्हणून खरेदीसाठी बाहेर पडता आलं. गेली कित्येक दिवस मी माझ्या मापाची ज्या विशिष्ट रंगातली खाकी शोधत होतो, ती मला ५३ स्ट्रीट वरच्या ओल्ड-नेव्ही मधे मिळाली. भारतात शासकीय गणवेशाच्या रंगामुळे, खाकी रंगाच्या पॅन्ट आपल्या वापरात शक्यतो नसतात, पण अमेरिकेत रंगाचा तो संकेत नसल्याने खाकी इतर [...]
मुंबईच्या २६/११ च्या हल्ल्याला वर्ष झालं. अनेकांनी सांत्विक संताप व्यक्त केले. जनसामान्यांचा रोष राज्यकर्त्यांवर होताच, परंतु एक वर्षानंतरही अगदी मूलभूत स्वरूपाचे प्रश्न शिल्लक आहेत ज्याला कदाचित भिती म्हणता येणार नाही पण काहिशा वेगळ्या भाषेत – ‘Areas we must need to improve’ अश्या स्वरूपाचे आहेत. या प्रश्नांवर राज्य/केंद्र सरकारला काम करायला वेळ मिळाला नसेलच, [...]
सकाळी सकाळी कॅफेटेरीयात तो कॉफी पित असताना अचानक ती प्रकट झाली.
तिला असं अचानक हसतमुखानं समोर पाहून त्यालाही आश्चर्य वाटलं.
” काय लेटर घेतलं ना ? मग अप्रॅझल कसं झालं यावेळी ?
ए सांग ना, किती पर्सेंट ? ” .. त्याच हसर्या मुखातून !
” तेवीस टक्के ! “, गालावर साधारण दोन टक्के स्माईल आणत त्याने सांगितलं, कधी [...]