… मूर्त पेक्षा अमूर्त रंग-रेषा ही तेवढाच आनंद देतात. चित्र काढताना बाकिचं सगळ विसरलं जातं, रंग-रेषा-मिकचा कागद .. आणि आनंदच आनंद .. एक रंगित मेडिटेशन ! खरच काय बरं संबंध आहे वृत्तींचा आणि रंगांचा ? वृत्तींना रंग असतो का ? रंगाच्या वृत्ती असतात का ? मनाच्या बहिर्मुखतेला अंतरंगात डोकवायला लावायच सामर्थ्य रंगात आहे, म्हणून तर [...]
मथाई रिकार्ड चं ‘हॅप्पिनेस’ पुस्तक ऐकत असताना लक्षात राहिलेला गोल्डन रूल म्हणजे – माणसाला मृत्यू, व्याधी, (प्रिय व्यक्तीपासून) विभक्ती आणि अपयश कधीही येऊ शकतं. अर्थात हा नियम लक्षात ठेऊन जर आनंदाने जगायचं ठरवलं तर त्रास कमी होतो .. कारण यातील कोणत्याही वेदनेमधे शारीरिक वेदनेपेक्षा मानसिक वेदनेचाच भाग जास्त असल्याने वरिल नियम त्या सोसण्यासाठी मानसिक तयारी [...]
” एका क्षणावर विजय मिळवून तो साजरा करायची उसंत मिळते तोच पुढचे क्षण नवीन प्रश्न घेऊन ऊभे असलेले आयुष्य खुणावत असते. सर्वसाधारण जगण्याचा प्रवाह ठरलेला, त्या सर्वसाधरण जगण्याच्या प्रवाहाचे टॉलरन्सेसदेखील ठरलेले असतात. मिनिमम टॉलरन्सच्या आसपास जाणारे आयुष्य दुय्यम दर्जाचे वा साधारण मानले जाते तर याच्याच मॅक्स टॉलरन्सने जगले जाणारे उत्तम वा चांगले मानन्याचा समाजग्रह असतो. [...]
“सोचो, चाहते क्या हो ?”,
‘पाथ ऑफ डिव्हाईन लाईफ’ च्या शिबिरात पहिल्या दिवशी विचारलेला हा प्रश्न, मला नेहमीच अनुत्तरीत करत आलाय. करियर संबंधी निर्णय घेताना, वैयक्तिक समस्या सोडवताना वा इतर काही निर्णय घेताना या प्रश्नाने मला एक प्रकारे मदतच केली, पण तरीही या प्रश्नाचं निश्चित असं उत्तर मला मिळलं नाही. परवा एका मित्राबरोबर गप्पा [...]