• मेड इन पाकिस्तान

    विकएन्डला स्वच्छ सूर्यप्रकाश पडला होता आणि तापमान १-२ च्या आसपास होत, म्हणून खरेदीसाठी बाहेर पडता आलं. गेली कित्येक दिवस मी माझ्या मापाची‌ ज्या विशिष्ट रंगातली खाकी शोधत होतो, ती‌ मला ५३ स्ट्रीट वरच्या ओल्ड-नेव्ही मधे मिळाली. भारतात शासकीय गणवेशाच्या रंगामुळे, खाकी रंगाच्या पॅन्ट आपल्या वापरात शक्यतो नसतात, पण अमेरिकेत रंगाचा तो संकेत नसल्याने खाकी इतर [...]