• आजारपण :: गांxx जळते तेव्हा !

    प्रत्येक आजारपण काहितरी नविन शिकवतं, रोजच्या जगण्याकडे आपण नविन दृष्टीने पहातो,
    गरजांचे प्राधान्यक्रम बदलतात, स्वत:चं नगण्यतत्व आणि घरातल्यांचं महत्त्व समजतं ..
    आजारपणावर असं बरंच काही लिहिता येईल, ( दुर्गाबाईंनी‌ असं आजारी असतानाच ‘ऋतूचक्र’ पुस्तक लिहिलं म्हणे. )
    आणि हो त्यानंतर एक नविन जगणं परत सुरू होतं, हेही‌ महत्त्वाचं.
    जानेवारीच्या शेवटच्या दिड आठवड्यात आयोवामधल्या हिमवृष्टीनं कहर केला, त्याच वेळी शरिराने [...]