दोन वर्ष अमेरिकेत रहात असताना ज्या गोष्टिचा मला विसर पडला होता तो प्रश्न परत डोकं काढायला लागलाय .. माझी जात ! माझ्या वैयक्तित आयुष्यात घडत असणाऱ्या घटनांमधे काही लोकांचे स्टॅन्ड पहाता ‘जात’ शब्दामुळंच मी (आणि ‘ती’ सुद्धा) सध्यातरी प्रचंड वैतागलो आहे, अर्थात जात आणि धर्म यावर बौद्धिक करण्याइतका मी मोठा नसलो तरी असलेल्या सिस्टमचा आणि धर्माच्या नावावर चाललेल्या राडारोड्याचा उबग न येण्याइतका संयमीदेखील नाही.
अशा मनस्थितीत माझी डायरी चाळताना एक जुना विचार-आराखडा समोर आला तो इथे दिलाय. त्यादिवशी स्वत:ला उच्चकुलोत्पन्न समजणाऱ्या एका व्यक्तिशी चर्चा करताना डोकं सुन्न झालं आणि काहीप्रश्न पडले. अर्थात हे होत असताना माझ्या विचारविश्वावर स्टिव्ह जॉब्ज, मथाई रिकार्ड, दलाई लामा, थिक-नात-हान आदी ‘बुद्धिस्ट’ असलेल्यांचा प्रभाव होता/आहे.
मनातला विचारगुंता पुढील क्रमाने होत गेला :
१. धर्म आणि जात – माझा कोणता ? कसा ? कोणाच्या इच्छेने ?
२. अभ्यास करून एक निवडता येत नाही का ?
३. जगाचा आणि जगण्याचा हा खरच मुलभूत प्रश्न आहे का ?
४. Steve Jobs, Michael Gelb, Matthieu Ricard आदी लोकांप्रमाने आपणदेखील बुद्धिस्ट व्हावे का ?
५. हो / नो : काहिही असेल तर का ? पण अभ्यास-वाचन करायला हरकत नाही.
६. इतर धर्मांचाही विचार करायला हरकत नाही.
७. अध्यात्म, मेडीटेशन आणि तथागत धर्म या दोनही गोष्टींचा खरच संबंध आहे का ?
८. धर्माखेरिज केवळ अध्यात्मिक मूल्यांवर जगणं का असू नये ?
९. वरील येणारे विचार हे केवळ स्मशान वैराग्यासारखे तात्पुरते तर नाहित ना ?
१०. बराच वेळ वरील विचार झाल्यावर, कुठेतरी वाचलेली एक गोष्ट लक्षात आली : जेव्हा युरोपमधे ज्ञानविज्ञानाची क्रान्ती होत होती तेव्हा भारतात सतीच्या चालीवोरुद्ध बंड होत होते आणि असेहीम्हणातात की इथले तथागत विद्वान ‘सत्यनारायणाच्या पुजेला पावशेराचा रवा असावा की अर्धाशेराचा ?’ यावर चर्चा करत होते. (हे होत असताना शांतपणे )
११. हे सर्व होत असताना मनिष व्यासची ‘सत्त्वा’ ऐकत होतो. डोकं शांन्त झाल्यावर एक गोष्ट लक्शात आली #१-९ मधील विचार हे #१० प्रमाणेच मला भरकटवत तर नाहीत ना ?
अर्थात त्या दिवसानंतर धर्म बदलण्याचं खूळ डोक्यातून निघून गेलं, पण त्या दिवसाची आठवण वहित अजून आहे.
Related posts:



[...] This post was mentioned on Twitter by Somesh . Somesh said: मी धर्म बदलू का ? http://thelife.in/?p=644 [...]
Posted by Tweets that mention मी धर्म बदलू का ? | The Life -- Topsy.com
Link | July 14th, 2010 at 7:26 pm
Done good analysis
[Reply]
Ashok Ghuge Reply:
July 28th, 2010 at 10:14 am
Dear Mr. Somesh ji,
“Dharm badaloo kaa?” hya article/lekhatil tuze vichar bhannnat aahet, buwa? Saamaanya maanus nakkich pahilya pratham gaarad hoeel, kase?
Rgrds.
[Reply]
Posted by Ramesh
Link | July 15th, 2010 at 12:50 pm
त्यापेक्षा आपण स्वतःला बदला… किंवा आपला नक्की धर्म कोणता हे समजून घ्या. आपले आचरण हाच आपला धर्म असतो… ह्यावर कोणी सुजाण माणूस आपल्या १-२ तास तरी प्रवचन नक्की देऊ शकेल… आपली “ऐकायची” तयारी असेल तर…
[Reply]
Posted by शिरीष
Link | July 19th, 2010 at 5:24 pm
धर्म कुठला आहे हे महत्त्वाचे नाही. आपण ह्या भूलोकावर कसे वागतो / वावरतो हे महत्त्वाचे.
कुठला एक धर्मा निवडायची गरजच नाहीए.
[Reply]
Posted by Amit
Link | July 21st, 2010 at 1:29 pm
धर्म म्हणजे काही नेसूची लंगोटी नव्हे की जी झाली घाण म्हणून बदलली आणि साफ झाल्यावर पुन्हा घातली.. किंवा साफ होईपर्यंत दुसरी वापरली…
स्वतःच वापरल्याने ती घाण होते मग इतरांना दोष का देता…?
पहा थिंकून…
[Reply]
Posted by श्रीरीष
Link | July 27th, 2010 at 1:00 pm
अरे मला पण असे पूर्वी प्रश्न पडायचे. पण नंतर कळलं की या गोष्टी फक्त मानण्यावर आहेत. या गोष्टींचा विचार केलाच नाही तर काही फरक पडत नाही.
पण एक गोष्ट नक्की की धर्म बदलून काहीच फरक पडत नाही. उलट तू हिंदू आहेस हेच सगळ्यात चांगली गोष्ट आहे. कारण हिंदू असा एकमेव धर्म आहे जो विज्ञानाचा पुरस्कार करतो.
आपल्या कडे लोक असे होऊन गेले जे विज्ञानाच्या विरोधात होते. पण आपला धर्म तसा नाही. आपला धर्म आपल्या पृथ्वी सपाट आहे, सूर्य पृथ्वी भोवती फिरतो, देवाने जे निर्माण केले ते सगळे शाश्वत आहे. असे काही सांगत नाही. आपल्या धर्माच तत्वज्ञान, विज्ञान आणि प्रगतीच्या आड येत नाही. आणि बौद्ध धर्माचा पायाच हिंदू धर्म आहे, त्यामुळे मूळ तत्वज्ञान बदलत नाही.
राहता राहिला प्रश्न जातीचा, जे लोक जात बघतात, विचारतात ते लोक अजूनही १८ व्या शतकात जगतात. कूळ वगैरे सगळ्या गोष्टी थोतांड आहेत. समाजातल महत्व टिकून राहण्या साठी त्यांना असा कांगावा करावा लागतो. त्यांच्या या ‘कुळाची’ किंमत, आपण देण्यावर असते. आपणच त्यांची किंमत वाढवली आहे. आणि आता आपणच आपले आचार आणि विचार बदलून ती योग्यतेला आणली पाहिजे.असे विचार असणाऱ्या लोकांना तुच्छ लेखायला शिक (दर वेळी जाहीर कराची गरज नाही.). याने सामाजिक प्रश्न सुटत नाही पण मनाचे क्लेश नक्की कमी होतात.
P.S. आणि हो, गरज पडली तर अश्या व्यक्ती च्या तोंडावर पण जाहीर कराव. नाहीतर समाज कसा बदलणार???
मी तरी अस १-२ वेळा केल आहे. अनुभव चांगला आहे. लोकांना आपली पायरी कळते.
तस ट्रेनिंग हव असेल तर मला फोन कर..
[Reply]
मी Reply:
August 10th, 2010 at 6:31 pm
मनाली,
या पोस्टवरील प्रतिक्रीयेबद्दल धन्यवाद. मला कदाचित तुझ्या ट्युशनची गरज पडेलच असं दिसतय.:) तू माझी लेटेस्ट व्हिज्युअल पोस्ट – लव्ह मॅरेज::आणि एक प्रॉब्लेम वाचलिस का ? btw तु दिलेली कमेन्टच एका पोस्टएवढी आहे :)
[Reply]
Posted by Manali
Link | August 10th, 2010 at 7:25 am
हे हे… आरे यावर, या दृष्टीने पण मी थोडा अभ्यास केला आहे. मी यावर ३-४ तास पण बोलू शकते. आणि मला तुझा माइंड map आवडला.
[Reply]
Posted by Manali
Link | August 11th, 2010 at 6:06 am
अरे सोबा, तुलाही शेवटी धर्माचा प्रश्न पडलाच तर… धर्म बदलून काय होईल? माणूस बदलणार आहे का?
अरे धर्म बदलून माणूस बदलत नाही.
[Reply]
मी Reply:
August 17th, 2010 at 6:52 pm
हा प्रश्न त्यावेळी पडला होता, आता नाही. पण एक नक्की हा विचार ज्यावेळी बुद्धीला शिवतो त्यावेळी बुद्धी एका वेगळ्याच पातळीवर विचार करत अस्ते.
[Reply]
Posted by मुक्त कलंदर
Link | August 17th, 2010 at 5:45 pm
Hi, Somesh
mala vatatay me barayach late comment detoy,
bara aso, mulat Dharma ya shabdacha artha samjavoon ghena mahatvacha ahe…. dharma ashya kalat astitavat ale, jeva vidnyan manasana padat aslelya prashnanchi uttare deu shakat navata.
tyamule tya tya kalat ‘vidvan’ samajlyajanarya lokanchya bolnyavar lok vishawas thevayche,
ani tyachmule hya vidvanani paap ani punya, hya
don(2) category madhe mansanchya activities na takla. varoon tyala ‘Dharama’ ani ‘Dev’ hya goshtinsobat bandhala, vayit karamabaddal bhiti tayar vhavi manoon ankhi kahi navin goshti tyat taklya…..
tynacha main intention hech asava ki mansancha behaviour- pranyanpasun vegla karava.
human society barobar chalavi,,,,,
pan he sagla karat asatana tyana tynach varchaswa tikvoon rahava hyasathi, varachi jaat, ani khalachi jaat asle funde anave lagle asavet.
somesh mala vatate hya vishayavar jevdha sangata yeil tevdha kami ahe,,,pan dev ani tyabaddal kahi goshti na lihinach bara,,,
pan ek goshta mala ithe pramukhyane mention karavishi vatate,
ki shraddha ani andhashraddha hya don goshtimadhe khupach chhotishi resh (antar) aste ani barech lok te par karatat.
ani aapan baki prnaynpeksha vegale hyach mule vegle ahot ki aapan prashna vicharoo shakto, we have most complex n intelligent brain,
pan hyacha artha he hot nahi ki aapan shreshta ahot, even single cellular ameoba from the start of life earth var ahe ani,,ajunani jagnyat successful zala ahe even after crores of year as compared to human civilisation facta few 10s of thousands of years.
as human brain is the most destructive weapon,
lets see if we can beat ameoba..;););)
but i am optimistic!!!
[Reply]
Posted by Krishna
Link | August 31st, 2010 at 2:27 pm
Ani ho somesh thoda rahilach Ha ha far lamb lihitoy me,,,,
१. धर्म आणि जात – माझा कोणता ? कसा ? कोणाच्या इच्छेने ?
mala vatatay hyacha tula thoda clue lagla asel ata.
२. अभ्यास करून एक निवडता येत नाही का ?
ho jarror ani tich kalachi garaj ahe,,jasa tu aj
abhyas karron outdated softaware use karana banda karto nahitar update karto tech same dharmachya babtit karana avashyak ahe…Ho pan he sgla karatana samajashi asleli bandhilaki ani tyacha samajavar honara parinaam lakshat ghena khup mahatcvacha ahe… nahitar,dharmachya navavar honarya dangli aapan elklya baghitlay ahech..
jar aapn dharma dharmach karat rahilo asto tar sata samudrakade jana dharmat mannya navata ani aapan geloch na mag?…
>>>use science to protect body.
>>>and dharma to protect brain.
(if body goes out of control only individual gets affected )
(but if brain goes out of control whole society has to face the consequences)
[Reply]
Posted by Krishna Bharati
Link | August 31st, 2010 at 2:47 pm
SOMESHS SEEMS DER WAS SOME PROBLEM,,,,,
THAT WAS THE LAST PART OF MY COMMENT.,.HERES BELOW THE FIRST PART….
[Reply]
Posted by Krishna Bharati
Link | August 31st, 2010 at 3:22 pm
कृष्णा,
तुझ्या विस्तृत कमेन्टबद्दल धन्यवाद.धर्माची इव्हॉल्वमेन्ट बद्दल तू मांडालेली आयडिया मला नविन आहे, त्या दिशेने विचार करायला हरकत नाही.
>>>use science to protect body.
>>>and dharma to protect brain.
हा तर चिरंतन सत्य विचार आहे. :)
[Reply]
Posted by मी
Link | August 31st, 2010 at 4:17 pm