जानेवारीनंतर उबन्टू लिनक्स वापरण्याचा केलेला प्रयत्न चांगलाच यशस्वी झालाय. गेल्या पाच महिन्यात मी विन्डोज केवळ गुगल व्हिडिओ चॅटसाठी वापरल. त्याशिवाय वापरण्याची कधी गरज पडली नाही किंवा वेळहीआली नाही. गेले काही दिवस उबन्टू १०.०४ ची चर्चा ऐकून काल एकदाच ट्रायल म्हणून हार्डडिस्कवर एका बाजूला उबन्टू १०.०४ टाकलं, फर्स्ट इंप्रेशन तर जबरदस्त आहे. मला आवडलेल्या गोष्टींची ठळक यादी देतोय, सोबत माझा ताजा डेस्कटॉप स्क्रीन जोडला आहे :
१. इन्स्टॉल करताना हार्डडिस्कवर असलेल्या विन्डोज आणि उबन्टू ९.१० मधून डॉक्युमेन्ट्स आणि सेटींग इम्पोर्ट करायची सोय.
२. बिल्ट-इन सोशल नेटवर्किंग टूल, एकाच वेळी ट्विटर, फेसबुक आदी अनेक साईटवर एका क्लिकमधे मेसेज टाकता येतो.
३. आयबस डिफॉल्ट इन्स्टॉल्ट होते, यात मराठी टायपिंगसाठी तिनही पर्याय उपलब्ध आहेत.
४. डेलबरोबर ब्राईटनेस कंट्रोल प्लगिन टकाटक चालतय. सुमारे एक मिनट इनाऍक्टीव्ह असल्यास ब्राईटनेस डिम होतो, हे फिचर उबन्टूवर प्रथमच पाहतोय, यापूर्वी मॅकवर पाहिलं होतं.
५. युआय एकदम ढासू आहे हे सांगायला नकोच, सोबत जर कैरो डॉकबार इन्स्टॉल केला तर आनंदच.
६. उबन्टू ९.१० ची थिम मला आवडली होती, ती यावेळी का उपल्ब्ध नाही , ते माहित नाही. तसच बूट-लोडर अजूनही कृष्ण-धवलच आहे, तो मला कष्टाने बदलता येतो पण उबन्टू इन्स्टॉलर त्याला कधी कधी बदलणार ?
७. नविन मशिनवर आलेली ‘gbrainy’ मधे एकदम चकाट्या कोडी आहे, काल बसल्याबसल्या तासदिडतास कसा गेला ते कळल नाही. शकुंतलादेवींच्या पझल्स-टू-पझल-यू ची आठवण झाली.
८. गुगल व्हाईस चॅट व्यवस्थित चालताय बोलतय !
९. याच मशिनवर विन्डोज ७ पेक्शा बूट टाईम जवळजवळ २/३ कमी लागतो. :)
Related posts:



सही रे.. मी पण उबुंटूचे किडे केले होते माझ्या लॅपटॉपवर. मजा येते.. पण सध्या तरी खिडक्याच चालू आहेत..
[Reply]
Posted by हेरंब
Link | May 28th, 2010 at 12:08 am
[...] This post was mentioned on Twitter by Somesh , द लाईफ . द लाईफ said: नविन पोस्ट – उबन्टू १०.०४ :: टाका रे ! http://thelife.in/?p=627 [...]
Posted by Tweets that mention उबन्टू १०.०४ :: टाका रे ! | The Life -- Topsy.com
Link | May 28th, 2010 at 12:22 am
मी १०.४ साठी थोडी चिवचीव केली !
पण मला त्यातील package manager आवडला नाही.
बराच त्रास देतो !
कदाचीत मी नवखा असल्यामूळे ……………
[Reply]
Posted by चिव चीव
Link | May 28th, 2010 at 4:06 am
प्रयत्न करून बघतो पर्सनल लॅपटॉप वर :)
मागच्या वेळेस मला इंटरनेट कनेक्षन सेट नाही करता आले.
आता तुम्ही यालच भारतात…त्यामुळे काही प्रॉब्लेम आला तर विचारीन :)
[Reply]
Posted by Amit
Link | May 28th, 2010 at 10:46 am
मी पण उबुंटू १०.०४ टाकले आहे. आवडले. प्रथमच वापरतोय. पण मला त्यावर मराठी टायपिंग साठी Google IME टाकता येत नाही. मी विंडोज मधे तेच वापरतोय त्यामुळे सवय झाली आहे.
३. आयबस डिफॉल्ट इन्स्टॉल्ट होते, यात मराठी टायपिंगसाठी तिनही पर्याय उपलब्ध आहेत.
कृपया या ‘आयबस बद्दल’ मला माहिती द्या. यामुळे कुठल्याही टायपिंग प्रोग्राम मध्ये मराठी टाईप करता येईल का? हे मराठी टायपिंग मला त्यावर चालू करता येत नसल्यामुळे मी पूर्णपणे उबुंटू वापरत नाही.
[Reply]
मी Reply:
May 29th, 2010 at 1:19 am
1. Click on this menu item : System->Preferences->IBus Preference
2. IBus will start
[Reply]
Posted by सीताराम वाळके
Link | May 28th, 2010 at 11:15 am
खरंच टाका. बेष्ट आहे.
[Reply]
Posted by Pankaj - भटकंती Unlimited
Link | May 28th, 2010 at 12:22 pm
Its good one, before commenting I will try it once.
[Reply]
Posted by Ramesh
Link | May 31st, 2010 at 8:46 am
I tried number of times, but I couldnot set the internet connection. I am trying on USB now. I f I find any problem, could you please help me ?
Thanks for giving the support to Linux….
I wish to use 100% Linux…. No windos..
It seems that the time has come to get rid of windows
Vijay
[Reply]
vijay Reply:
June 8th, 2010 at 1:57 am
I have installed kubuntu now. Its really great !!! Thanks !!!
Still I cannot configure wireless network. Is there anything special about it ?
[Reply]
मी Reply:
June 8th, 2010 at 9:11 am
विजय,
माझ्या 9.10 वर wicd हा नेटवर्क मॅनेजर टाकलेला आहे, तसच ब्रॉडकॉमचा wl module मी स्वत:कंपाईल करून इन्स्टॉल केला. माझ्याकडे wifi चालत आहे. तुमच्या मशिनवर वायर्ड ईंटरनेट चालायला हव, त्याशिवाय वाय-फाय साठी-तुमचे वायलेस कार्ड कोणते आहे त्यासंदर्भात शोधाशोध केल्यास नेट चालू होईल. अधिक माहिती दिल्यास मदत करता येईल.
मी कुबंटूपेक्षा उबन्टू वापरण सोयिस्कर मानतो, कारण त्यावर मला डॉकबार टाकता येतो. तसच कुबन्टूचा पॅकेजमॅनेजर कधिमधि त्रास देतो.
[Reply]
Posted by vijay
Link | June 1st, 2010 at 6:35 am
Thanks a lot. There is no problem in wired connection. We have secured wireless connection in our university, for which I use secureW2 client in windows. I don’t know the equivalent in ubuntu. I think it needs some parameters like WEP key etc, which I am unable to understand.
I think I am using 802.11bg card. But it works with unsecured network.
Anyways, it is nice to see the ubuntu and I am happy to use linux after so long time.
Just two more questions. Which edition I should use for laptop and desktop. Two different or same will be ok ?
Is there any problem, if we install linux fully (removing windows) and then if one wish to return back to windows, then the process is not simple. Is it true ? (BTW, who will like to go back to windows ;) ).
Thanks in advance.
Vijay
[Reply]
मी Reply:
June 8th, 2010 at 2:54 pm
विजय,
विन्डोजवरून १०० % लिनक्सला जाण्याचा पर्याय उत्तमच आहे, परंतु तुम्ही संगणक नक्की कशासाठी वापरता यावरदेखील हे अवलंबून आहे, कारण काही खाजगी सेवा फक्त विन्डोजवरच चालतात आणि लिनक्सवर त्याचे पर्याय उपलब्ध नाहित. मला गेल्या सहा महिन्यात फक्त ३ सेवांसाठी विन्दोज वापरावे लागले :
१. गुगल व्हिडिओ चॅट
२. अमॅझॉन किन्डल्चे डेस्कटॉप एडिशन
३. Audible.com वरून डाऊनलोड केलेली पुस्तके ऐकण्यासाठी
त्यामुळे या तीनसेवांसाठी मला विन्डोज वापरावे लागते. तुम्हाला यासारख्या सेवा वापरायच्या नसतील तर तुम्ही लिनक्स वापरूशकता. एकदा लिनक्स इन्स्टॉल केल की पुऩा जर विन्डोज ची गरज पडली तर Virtual Box देखील वापरू शकता. Virtual Box चा वापर करून लिनक्सवर लिनक्स देखील ट्राय करू शकता.
वायरलेस : अधिक माहिती नेटवर पहा किंवा http://plug.org.in ची मेलिंग लिस्टवर सबस्क्राईब करा, तेथिल अनेक टेकी लोक आपणाला न.क्कीच मदत करतील.
[Reply]
Posted by Vijay
Link | June 8th, 2010 at 11:30 am
mp3 वगैरे चालवायला उबुटु खूप त्रास देते. त्यामुळे मी linux Mint वापरतो. कोणा नवख्याला मी उबुटु नव्हे तर mint ची च शिफारस करेन.
Ubuntu प्रमाणे resticted format Flash etc. चा काहीच त्रास नाही. Out of the box डायरेक्ट सुरु होते. आणि Ubuntu Derivative असल्याने Virus Free, Stability etc. हे Ubuntu चे फायदे पण मिळतात.
[Reply]
Posted by Abhay
Link | June 9th, 2010 at 9:32 am
Can I use edubuntu on mint ? I think it should, but for latest version of mint.
[Reply]
Posted by vijay
Link | June 15th, 2010 at 8:30 am