नैराश्य :: माझा पर्सनल डिझास्टर रिकव्हरी प्लॅन

डिझास्टर मॅनेजमेन्ट हा कोणत्याही व्यवसायाचा अविभाज्य घटक झालेला आहे, त्या अनुषंगाने कंपन्यांच्या डिझास्टर मॅनेजमेन्ट पॉलिसीज देखील असतात, यामधे भूकंप, आग आदी‌ संकट आल्यास कंपनीचे नुकसान कसे टाळता येईल व व्यवसाय कसा सुरू राहिल अशी मार्गदर्शक तत्व असतात व त्यानुसार संकटातदेखील तग धरता येते. जर कंपनीचा असा प्लॅन असतो तर आपल्या स्वत:साठी का नाही ? मनाला जेव्हा प्रचंड खिन्नता वाटते, निराशेचं काहूर माजतं त्यावेळी‌ काय करायचं हे कुठेतरी लिहिलं पाहिजे ना आणि हे ठरवणारा स्वत:पेक्शा जास्त चांगला कोण असेल ?

डिजास्टर

डिजास्टर

मागिल आठवड्यात काही मानसिक संकटांमधून जात असताना Dale Carnegie चा keep yourself busy in something हा नियम आठवला आणि स्वत:ला आवडत्या कामात झोकून दिलं .. माईन्ड मॅपिंगच्या, मी काही तास या कामात व्यस्त होतो बरच मंथन झालं, सरते शेवटी माझ्यासारखा आनंदी मीच होतो कारण तयार झालेलं आऊटपुट पण तसच होतं, त्यानंतर ‘प्लॅन’नुसार आईला फोन केला, तिच्याशी बोललो. त्यावेळी तयार झालेला माईन्ड मॅप इथे देतोय – माझा Personal disaster recovery plan !

चित्राच्या अनुषंगाने तुमचा स्वत:चा प्लॅन बनवताना खालील मुद्दे कदाचित उपयोगी पडतील,

१. ऍसेटस
सर्वात महत्वाची नोड. यात सगळे +ve पॉइन्टस लिहिले आहेत. स्वत:च्या भन्नाट क्वालिटीज. यातील मुद्यांचं वर्गिकरण अनेक अंगानी करता येईल, पण विशेष वाटणारे लिहिलेत. जेव्हा आपण निराश होतो तेव्हा बहुतेक हे सगळे मुद्दे विसरले जातात आणि केवळ आपल्यातील ‘न्यून’ मनावर ताबा घेते, त्यावेळी हे सगळं आठवावं म्हणून लिहलं.

२. मेगा-गोल्स
स्थल-काल याचा प्रभाव नसलेले माझे महा-गोल्स यात लिहिले. जेव्हा जेव्हा एखादी चुकीची वाटणारी, खिन्नता देणारी घटना घडेल त्यावेळी तिचं‌ मुल्यमापन करताना याचा वापर मला होईल. म्हणजे ती घटना जर ‘या’ गोल्सना अडथळा करत नसेल तर नाराज व्हायच कारण नाही, हो ना ? कारण मेगा-गोलच्या तुलनेत ती फारच छोटी गोष्ट असेल, तुमचे मेगा गोल्स काय आहेत ?

३. प्रोजेक्टस
यामधे नोकरीवरच्या प्रोजेक्टपासून मनात असलेल्या सगळ्या प्रोजेक्टसची यादी‌ केली, अगदी घर स्वच्छ करण्यापर्यंत. कारण ‘डिप्रेस’ वाटत असताना नक्की करायचे काय हे सुचत नाही, त्यामुळे ही यादी पाहून कामाला लागता येईल. तसंच जर ऑफिसमधील तणावामुळे निराश झालो तर नोकरी हा शेवटचा पर्याय नाही, बाकीचं बरच काही करता येईल, हे लक्षात रहावं म्हणून इथे सगळे पर्याय लिहून टाकले.

४. टूल्स
यामधे माझ्या आवडत्या टूल्स/टेक्निकची यादी आहे. यात काही गेम्सदेखील टाकल्या आहेत. कंटाळा आल्यावर काय-काय करता येऊ शकेल हे लिहिता लिहिता माझ्या दैनंदिन वापरातल्या टुल्सचाही यात समावेश झाला, अगदीच काय न सांगण्यासारख्या गोष्टी देखील तिथे लिहून काढल्या.

५. पुस्तकं
‘पुस्तकस्थ गतं विद्या ..’ या सुभाषिताप्रमाणे पुस्तकातलं जर ऐन वेळी आठवलं नाही तर काय उपयोग ? त्यामुळे कंटाळा आला तर एक्साईटींग काय वाचता येईल, जे यापूर्वी आवडलं आणि प्रभावशाली वाटलं त्यांची एक लिस्ट मारली. :)

६. टुडू लिस्ट
कंटाळा येण्याचे काही पॅटर्न असतात. काही ठराविक घटना, व्यक्ती किंवा स्थिती‌ यामुळे त्यांची पुनरावृत्ती होते. कधी वैयक्तित तर कधी‌ प्रोफेशनल लाईफमधे. अशावेळी‌ वेळ कशी‌ मारून न्यायची किंवा आपल्या कोणत्या चुकांमुळे हे होतं आणि त्या कश्या सुधारता येतील हे मुद्दे यात टाकले.

७. नितिमूल्य
मी बऱ्याच वेळा अध्यात्म आणि व्यावसायिक जीवन यांची सांगड घालताना चुकतो, अशा वेळी मला विवेकानंदाची तत्वं सर्वात प्रेरणादायी वाटतात. तसच ‘रॅन्डी पॉश्च’ चं ‘(अर्थार्जनासाठी) काहितरी विकायचच असेल तर सर्वात महत्वाची गोष्ट विक – ते म्हणजे शिक्षण’ , हे वाक्य पटतं. त्यामुळे तोही‌ मुद्दा मी लिहिला आहे. प्रत्येकाच्या जगण्यामधे काही तात्विक आधार असू शकतो, तो लिहायला हरकत नाही.

८. लक्षात ठेव
हा मुद्दा मी इथे शेवट लिहितोय पण माझ्या दृष्टीने सर्वात महत्वाचा. यात मी माझ्या स्व्त:वरच्या मानसिक प्रथोमोपचाराचं सार टाकलं. यातिल ‘डिस्कस’ मधे माझ्या जवळच्या व्यक्तिची नाव लिहिली, ज्यांच्याशी मी बोलल्यावर मला आनंद वाटतो तसचं माझी समस्या सांगितली तर ते ‘मलम’ लावू शकतात. तसंच वाचण्याच्या किंवा ऐकण्याच्या काही नोंदी लिहिल्या, आणि सर्वात महत्वाचं तत्व जे मी हे करताना अनुसरलं ‘कशात तरी व्यस्त’ रहा.

.. शेवटी या सर्वाच्या मध्यभागी माझा एक हसरा फोटो टाकला, कदाचित त्यामुळे मला त्या हसऱ्या दिवसाची आठवण येईल.

दोन दिवसांपूर्वी एका ‘ब्लॉगिणीने’ कंटाळा आलाय म्हणून बझ्झ टाकले होते, तेव्हा ‘कंटाळा आला की काय करायचे’ यावर हा प्रपंच , पण ही असाईनमेन्ट करून बघायला हरकत नाही.

Related posts:

  1. मराठीभाषा :: प्रश्नांचा माईंडमॅप
  2. मराठीभाषा :: गळचेपीची कारणं !
  3. रंगरेषा :: एक मेडिटेशन !

Comments

  1. [...] This post was mentioned on Twitter by द लाईफ . द लाईफ said: नैराश्य :: माझा मेन्टल डिझास्टर प्लॅन http://thelife.in/?p=612 [...]

    Posted by Tweets that mention नैराश्य :: माझा मेन्टल डिझास्टर प्लॅन | The Life -- Topsy.com

    Link | April 28th, 2010 at 4:16 am

  2. वा फारच छान.
    मी पण हा प्रयत्न करून बघतो.

    [Reply]

    मी Reply:

    अरे आत्ताच मी पोस्ट टाकली आणि तू वाचलीस पण !
    हा प्रयोग करायला खरच हरकत नाही आणि हो, ही संकल्पना आकार घेताना मी अनुभवली आहे. म्हणजे सुरूवात करताना ‘शेवट’ डोळ्यासमोर नव्हता, फक्त मला ब्युझी व्हायचं होतं .. पण एक चांगली टूम तयार झाली. मी माईन्ड मॅपवर जर सेमिनार घेतले तर ही‌ असाइन्मेन्ट नक्की देईन. :)

    [Reply]

    Amit Reply:

    सोमेश,
    मी सुद्धा इंप्रेस होऊन लगेच एक माइंड माप बनवला आहे
    http://www.life-sense.in/?p=49
    :)

    [Reply]

    मी Reply:

    That’s cool, I am putting detailed comment there.

    [Reply]

    Posted by Amit

    Link | April 28th, 2010 at 4:29 am

  3. Sakali office madhye aalya aalya ha blog vachayala milala aani sagala thakawa dur zala (Kal ratri Rajveer purna ratra jaga hota). Chala navin jomane kamala suruwat karato :)

    Malahi ata ‘Projects’ yadi banvanyachi garaj prakrshane janavu lagali aahe.

    [Reply]

    मी Reply:

    प्रशान्त,
    मी ‘केलेले किडे’ खरच तुमच्या उपयोगी पडतायत हे पाहून मला ‘मजबूत’ आनंद होगया. रजवीर व्यवस्थित असेलच, त्याच्यासाठी ३ शुभ्र बदकं , आणि तुझ्या माईन्ड-मॅपला शुभेच्छा.
    ( मेथड आवडली असल्यास बाकीच्यांना लिन्क पाठवु शकतोस. )

    [Reply]

    Posted by Prashant

    Link | April 28th, 2010 at 5:16 am

  4. ह्याला “मेंटल डिझास्टर प्लॅन” असे न म्हणता “पर्सनल” किंवा “वैयक्तिक” हा शब्द योजणे आवश्यक आहे अन्यथा नक्की काय घोटाळा झालाय हे तुमच्या एव्हाना लक्षात आलेच असेल… नसेल तर आनंदच आहे सगळीकडे!

    तसे हा “डिझास्टर प्लॅन” नसून “डिझास्टर रिकव्हरी प्लॅन” आहे हे सुद्धा तितक्याच प्रकर्षाने नमूद करावे ही सप्रेम विनंती…

    [Reply]

    मी Reply:

    एनी व्हिजन इज इन्-कम्प्लीट विदाऊट गुरू !
    दुरूस्ती-सुचवल्याबद्दल धन्यवाद, दखल घेतली आहे .. आणि हो ‘आनंद’ तर आहेच, नाहितर इकडे कशाला आलो असतो ?

    [Reply]

    Posted by शिरीष

    Link | April 28th, 2010 at 5:40 am

  5. अनेकवार “उजळणी” केली कोणत्याही गोष्टीची (अगदी स्वव्यक्तिमत्वातील देखिल) की त्यातली “उणी” दृष्टीस पडतात असा अनुभव आहे… ती दूर करणे हाच खरा आयुष्यभराचा उद्योग!

    [Reply]

    मी Reply:

    हा त्याचाच एक कलात्मक भाग मानायला हरकत नाही‌ ..

    [Reply]

    शिरीष Reply:

    “रिकव्हरी इज ऑन” (RIO) हेच Rio-De-Janeiro ह्या नांवाचे समर्पक विस्तृत रुप असावे असा आमचा कयास आहे. बाकीचे उमजे पर्यंत Blame It On Rio नांवाचा चित्रपट पाहिल नसल्यास कालापव्ययासाठी पहावा.

    [Reply]

    Posted by शिरीष

    Link | April 28th, 2010 at 5:57 am

  6. असाईनमेन्टसाठी आठही मुद्द्यांचा उपयोग होतोय..
    धन्यवाद!

    [Reply]

    Posted by Meenal

    Link | April 28th, 2010 at 6:37 am

  7. Tuzya sathi 2 prashna:

    1. Sarva lokanchya comments marathi madhe aahet,quillpad or any other tool?

    2. Mindmap image farach chan aahe, tool konate vaparale aahe? XMind or any other tool?

    (Rajveer ekdam majet aahe)

    [Reply]

    मी Reply:

    प्रशान्त,
    १. मी लिनक्सवर डिफाल्ट टायपिंग टूल वापरतो, ज्यात मराठी कॉन्फिगर केले आहे, इतरांनी काय वापरले माहित नाही.

    २. हो, मी xmind वापरून हे मॅप तयार केले.

    [Reply]

    Posted by Prashant

    Link | April 28th, 2010 at 9:02 am

  8. परिस्थितीकडून अवास्तव अपेक्षा हे नैराश्याचे कारण आहे.

    [Reply]

    मी Reply:

    मनोहर,
    बरोबर आहे, ‘एका ओळीत’ सार आलाय.
    धन्यवाद !

    [Reply]

    Posted by मनोहर

    Link | April 28th, 2010 at 5:11 pm

  9. [...] days back Somesh came up with the idea of “Personal Disaster [...]

    Posted by Personal Disaster Management « Life…it makes sense

    Link | April 30th, 2010 at 7:34 am

  10. रिअली ग्रेट माईंड मॅप… संकटात सापडल्यावर नैराश्य येणे साहजिक आहे.. पण वेळेवर अशा प्रसंगावर मात कशी करावी या गोष्टीचे आधीपासूनच् व्यवस्थित नियोजन आणि विचार करून ठेवलेला नसल्यामुळे त्याची परिणीती भयंकर असते… बर्‍याच जणांना हा असा अनुभव कधी ना कधी येतोच… अशा प्रसंगी तोपर्यंत माहित असलेली नितीमुल्ये, उपलब्ध साधने, अर्थ, मित्र-परिवार या सगळ्या गोष्टींबद्दलचे ज्ञान असणे गरजेचे आहे… दादा, तू तयार केलेला माईंड-मॅप अगदी असाच आहे, जर प्रत्येकाने असे माईंड-मॅप्स आधीच बनवून ठेवले तर ते संकटकाळी नक्कीच फायदेशीर ठरू शकतील!

    [Reply]

    मी Reply:

    धन्यवाद विशाल,
    तू सुद्धा तुझा माईन्ड मॅप तयार कर आणि झाल्यावर इथे लिन्क देऊन नक्की शेअर कर.

    [Reply]

    Posted by विशाल तेलंग्रे

    Link | May 18th, 2010 at 7:15 am

  11. झकास आहे!
    तुमचा मॅप प्लॅन मला फार आवडला.
    आंतरजालावर माईंड मॅप करू देणारी काही स्थळेही आहेत.
    पण त्याला नैराश्य दूर करू शकणारा साधन जोडणे मस्तच!
    नैराश्य हा तसा सगळ्यांनाच छळणारा विषय आहे.

    मी पण यावर थोडे लिखाण केले होते ते येथे आहे.
    http://mr.upakram.org/node/1043

    सदस्यांचे प्रतिसादही वाचनिय आहेत!
    -आपला
    गुंडोपंत

    [Reply]

    मी Reply:

    धन्यवाद गुंडोपंत,
    याच वेबसाईटवर तुम्हाला अनेक माईन्ड मॅप सापडतील, जे हाताने काढलेले किंवा संगणकावर तयार केलेले आहेत, ज्यांचा उपयोग मी वेगवेगळ्या कारणांसाठी, विचारपद्धतीसाठी कसा करतो तेही लिहिले आहे. मी‌ आपला लेख वाचला, आपण दिलेले मुद्दे योग्यच आहेत. ‘डेल कार्निगी’ च यावर एक पुस्तकदेखील आहे, तो शास्त्रीय परिभषेत न जाता लेमन ट्र्ममधे सल्ला देतो. ..

    [Reply]

    Posted by गुंडोपंत

    Link | May 26th, 2010 at 2:47 am

Leave Your Comment