मागील वेळी भारतातून येताना डिजिटल फोटोंचा अल्बम घेऊन आलो होतो. आज प्रचंड उबग आला म्हणून एक-एक फोटो चाळत बसलो. माझा चेहरा फोटोजनिक नाहिय आणि त्यात कहर म्हणजे मला फ्लॅशपडताना डोळे मिचकायची सवय, त्यामुळे कोणताच फोटो निट येत नाही, या धरतीवर माझ्या लहानपणचा हा फोटो पहाताना मलाच प्रचंड हसू आलं, कारण अल्बम चाळताना बऱ्याच वेळानंतर माझा हसरा फोटो दिसला.
आता फोटोविषयी थोडसं, माझे आई-वडील ‘सोमेश्वराचे’ चे भक्त, या मंडळीचा असा विश्वास आहे की भगवान शंकर सर्परूपात प्रकट होतात, त्यांच्या त्या सर्परूपातील डोक्यावर विशिष्ट खूण असते, त्या प्रकट झालेल्या ‘देवाला’ पकडून कोणाच्या एका भक्ताच्या घरी नेतात, तिथे दूध पाजतात (?) भजन पूजन होते आणि दोन दिवसांनंतर त्याचे विसर्जन करतात, म्हणजे निर्जन ठिकाणी सोडून देतात. अशाच एका प्रसंगी काढलेला हा फोटो. यातील डोक्यापाठीमागे दाखवलेला चंद्र सोडला तर मी आणि माझ्या गळ्यातील प्राणी दोऩ्हीही खरे आहेत, आणि याच कारणाने आमच्या घरी साप मारत नाहीत. :)
गेल्या १७/१८ वर्षात हा सोहळा कधी अनुभवला नाही, भारतात गेल्यावर जाऊन येण्याच्या ठिकाणांमधे – ‘कडलास’, ‘करंजे’ आणि सोरटी ही क्षेत्र आहेत.



[...] This post was mentioned on Twitter by द लाईफ , Somesh . Somesh said: सर्पमाळ :: हजार आठवणींचा फोटो http://thelife.in/?p=604 [...]
Posted by Tweets that mention सर्पमाळ :: हजार आठवणींचा फोटो | The Life -- Topsy.com
Link | April 22nd, 2010 at 3:15 am
हा हा हा….फोटो फारच मस्ता आला आहे
[Reply]
Posted by Amit
Link | April 22nd, 2010 at 11:32 am
Waahh! kiti chan photo aahe. Lahanpani tu kupach smart hota.
[Reply]
Posted by Ramesh
Link | April 27th, 2010 at 5:58 am