कॅम्पस इंटरव्यूव च्या तयारीने जोर धरला होता, पुढे काय ही दिशा आता नक्की करायला पाहिजे होती. एका क्लासमेटने माझ्या डोक्यात सर्टीफिकेशनचं खूळ घातलं , त्यावर काय करता येईल याच विचारात मी होतो. ‘त्याच्याकडे’ त्यादिवशीचा लेसन संपल्यावर मी थांबलो , आणि त्याला मी ‘पुढे काय करू ?‘ अशा आशयाचा प्रश्न विचारला, माझ्यापुढे काही पर्याय होते -
१. मी VC++ शिकून मायक्रोसॉफ्ट सर्टीफाईड सोल्यूशन प्रोव्हाईडर होऊ का ?
२. थोडासा जावाचा अभ्यास करून सनची परीक्षा देऊ ?
३. ओरॅकल, सिक्वल मधे भरपूर पैसे मिळतात, ती परीक्षा देऊ का ?
४. मला लिनक्सची आवड आहे, मी पायथॉन आणि पर्ल मधे भरपूर ‘काड्या’ करून त्यात तरबेज होऊ का ?
५. वेब टेक्नॉलॉजी मधे भरपूर जॉब्ज आहेत , तिकडे जाऊ का ?
६. मी काय शिकू आणि काय करू – ज्यामुळे मला लगेच जॉब आणि भरपूर पगार मिळेल ..
७. की.. डॅक ??
हे सगळे पर्याय मी त्याला सांगितले.
.. सुमारे मिनिटभर मिनिटं डोळे मिटून तो त्याच्या आरामखुर्चीवर पडून राहिला. नंतर त्याने सुरूवात केली,
तुला माहित आहे का, ऑली राईटकडे विमान उडवताना विमान चालवायचा परवाना नव्हता, डेनिस रिचीला युनिवर्सिटीमधे जाऊन C शिकता आलं नाही, स्ट्राऊस्ट्रूपला C++ शिकवणारा गुरू कधीच भेटला नाही आणि मि. होन्डाला मोटरबाईक विकत घेण्याचा पर्याय नव्हता …
मी हसलो .. त्याच्या बोलण्यातली खोच मला समजली , आणि आश्चर्यही वाटलं, ही सगळी माहिती मला ‘शालेय शिक्षणाने’ दिली होती पण त्याभोवती हा असा विचार मात्र करायला शिकवला नव्हता … :)
आता तुझ्या प्रश्नांची उत्तरं, सोल्यूशन प्रोव्हाईडर होणं सोपं आहे, पण तुम्हाला ‘प्रॉब्लेम सांगणारा’च नसेल तर तुमच्या क्षमतेचा उपयोग शून्य, म्हणून प्रॉब्लेम फाईंडर होता आलं तर पहा .. सर्टिफाईड सोल्यूशन् प्रोव्हाईडर रग्गड मिळतील,
आणि शिकायचं काय म्हणशिल तर, ‘काहिही शिकायचं कस ?’ एवढच शिक !
Related posts:


Prathamach tumacha blog wachala…
aani hi post khup aawadali…..
chhan lihile aahet tumhi….
[Reply]
मी Reply:
March 15th, 2010 at 10:44 am
thank you Asmitha
[Reply]
Posted by Asmita Pawar Mendhe
Link | March 15th, 2010 at 6:35 am
+१..! पॉईण्ट आहे..
सोल्युशन प्रोव्हाईडर्स तर आजकाल गल्लो-गल्ली दिसतात. पण आपल्याला कोणते प्रॉब्लेम्स भेडसावत आहेत, हे सांगणारे व नंतर त्यावर काय सोल्युशन्स असू शकतील हे सुचवणारे मात्र कोणीच दिसत नाहीत..
मला तर ही कल्पना खुपच पटलिय, (नाही काही झालो तर याच पद्धतीने रग्गड पैसा कमावता येईल असे चान्सेस दिसताहेत!) ;-D
लेख एकदम छान लिहिलाय दादा..!
[Reply]
मी Reply:
March 15th, 2010 at 11:32 pm
त्या सोल्यूशन्सची कॅपिटलायझेशन पण करता आलं पाहिजे ..
[Reply]
Posted by विशाल तेलंग्रे
Link | March 15th, 2010 at 4:52 pm
kasla bhari post ahe! mala khup awdla..
pahilyandach ale ya blog var.. vachte ata..
[Reply]
मी Reply:
March 16th, 2010 at 1:27 am
Bhagyashree,
Comment baddal dhanywad, aanakhi kaahi post aahet jyamadhe ‘programming lessons’ share kelet ..
[Reply]
Posted by bhagyashree
Link | March 16th, 2010 at 12:54 am
Very well written. Really we need such guidance.
[Reply]
Posted by Ramesh
Link | March 17th, 2010 at 2:23 pm
वा! तुमचा ब्लॉग फारच छान आहे, आवडला!
इतक्या ओघवत्या शैलीतले सुंदर लिखाण वाचायला दिल्याबद्दल आभार!
आयुष्याच्या सुरुवातीच्या काळातले प्रश्न सोप्या पद्धतीने मांडता आइ त्यावरचे झकास उत्तरही देता. फारच आवडले. वर्तमानपत्रात कॉलम म्हणून द्यावे असे हे आहे.
किंवा किमान उपक्रम (http://mr.upakram.org/tracker), मिसळपाव, मायबोली आणि मनोगत या चावड्यांवर तरी येऊ द्या!
तसेच,, ‘मराठी प्रोग्रामींग’ असा शोध दिल्यावर हे पान सापडत नाही. सहजतेने जालावर हे सापडावे म्हणून काही कराल का?
वाचत राहीनच,पुढील लिखाणासाठी शुभेच्छा!
आपला
गुंडोपंत
[Reply]
मी Reply:
May 26th, 2010 at 10:32 pm
गुंडोपन्त,
प्रोग्रामिंग या विषयावर साईटवर आणखी काही ‘अनुभव’ टाकले आहेत, ते ‘प्रोग्रामिंग फंडा’ या सदराखाली येणारे आहेत. वाचायला हरकत नाही. आपण ऑस्ट्रेलियामधे असता का ?
[Reply]
Posted by गुंडोपंत
Link | May 26th, 2010 at 2:36 am