इंडियन की चायनिज ?

गेले आठवडा मनात सुरू असलेल्या एका द्वंद्वाची‌ कालपर्वा समाप्ती‌ झाली पण सल काही अजून गेली नाही, म्हणून ही आजची‌ पोस्ट. मागील आठवड्यात मराठी मंडळीवर एका चर्चेला सुरूवात झाली, संदर्भ होता ‘भारतीय सौर दिनदर्शिका’. जसा आपला राष्ट्रीय खेळ हॉकी आहे, पक्षी‌ मोर आहे, गीत – जन-गण-मन आहे, तशीच ही‌ आपली राष्ट्रीय दिनदर्शिका. २२ मार्चला आपल्या या राष्ट्रीय दिनदर्शिकेनुसार नविन वर्षाचा प्रारंभ होतोय त्यानिमित्त काहितरी तांत्रिक योगदान देता येईल का आणि असल्यास कसे यासंदर्भात ती होती, या चर्चेमधे वयाने आणि या क्षेत्रातील ज्ञानाने दिग्गज असलेल्या एका सदस्याच्या मुद्यांनी लक्ष वेधलं, हे मुद्दे त्यांच्या अनुभवांवर, आणि शास्त्रीय गोष्टींवर आधारलेले असले तरी त्याचा निष्कर्ष म्हणजे –

१. जगाची मान्यता मिळवल्याशिवाय याचा काहीच उपयोग नाही,
२. जग तुमच्या या दिनदर्शिकेचा वापर करत बसणार नाही .. व्यवहारी उपयोग शून्य ..
३. या मुद्यांवर ‘राष्ट्रीय दिनदर्शिका’, आपला स्वाभिमान म्हणून भावनिक होण्याची गरज नाही ..
४. ग्रेगोरीयन असताना ही आणखी कशाला ?

(‌ लिन्क : ही चर्चा आपणाला मराठीमंडळी वर पहायला मिळेल.)

मीही त्याच अनुषंगाने विचार करायला लागलो आणि – हे फाजिल उद्योग सोडून द्यावेत, आपल्या एकाने काय होणार आहे ? आणखी बक्कळ डॉलर कसे कमावता येतील याचा विचार कर, कुठे वेळ घालवतो .. असं काही वाटून देखील गेलं :). (यानंतर इतर सदस्यांच्या उत्साही प्रतिक्रीयांमुळे हा विचार मागे पडाला.)

….

चिनी कॅलेन्डर प्रचार

चिनी कॅलेन्डर प्रचार

परवा एका सहकाऱ्याबरोबर मिंग-वा नावाच्या चायनिज रेस्टॉरंटमधे गेलो होतो. कॅशकाऊन्टरवर बिल देताना कोणाच्याही नजरेत सहज यावं अशा ठिकाणी लावलेल्या छोट्याश्या ‘नोट’ने मला उत्तर दिलं, सोबतच्या ‘कलिग’ला ‘रिक्वेस्ट’ केली आणि त्याने घेतलेला तो फोटो इथे जोडलाय. रेस्तॉरान्त मधील ज्या चिनी कामगारांना इंग्लिश निट बोलता येत नाही, त्यांच्यासाठी ही चिठ्ठी नक्कीच नाही, पण ज्यांना त्याचा काहीच उपयोग नाही अशा रोज येणाऱ्या अमेरिकन लोकांसाठीच ती ‘नोट’ लावली आहे, हो ना ?

आजचे प्रश्न :

१. संस्कृती, राष्ट्रीयत्वाचा विचार, प्रसार, प्रचार, वापर करताना मी कोणाच्या पावलांवर चालू – व्यावहारिक फायदा काय ? जग काय म्हणेल ? पश्चिमेतील विद्वांनांना मान्य आहे का ? पक्षश्रेष्ठी काय म्हणतील ? असा विचार करणाऱ्या भारतीय पद्धतीवर ? की हा विचार न करणाऱ्या बेधडक चायनिज (?) पद्धतीवर ?

२. भारताची राष्ट्रीय दिनदर्शिका आहे हे तुम्हाला माहित होते काय ?


टीप : ही नोंद, आणि हे प्रश्न, मी‌ येथे ‘कऱ्हा ते मिसिसीपी’ या जग बघण्याच्या आणि अंतर्मुख होण्याचा अनुभवाचा भाग म्हणून केली आहे, यात कोणताही बाकीचा हेतू‌ नाही, याव्यतिरिक्त त्या चर्चेवर /विषयावर ‘मराठी-मंडळी’ वरील स्नेही‌ उत्साहाने विचारमंथन करतायत. वरील प्रश्नातील १ला प्रश्न त्या चर्चेसंदर्भात नाही.

Related posts:

  1. मुंबई २६/११ :: शिल्लक प्रश्नांचा माईन्ड मॅप
  2. मराठीभाषा :: प्रश्नांचा माईंडमॅप
  3. मी माझा धर्म बदलू का ?

Comments

  1. कोणतीही गोष्ट वापरली, तर टिकते. अजूनही हिंदू मंगलकार्यांसाठी आणि सणांसाठी, उद्घाटनांसाठी इ. भारतीय दिनदर्शिकेचाच वापर होतो. कार्यालयीन कामासाठी ग्रेगरियन कॅलेंडर जरुर वापरा, पण आपल्याही सौर दिनदर्शिकेला भिंतीवर स्थान द्यायला विसरु नका.

    [Reply]

    मी Reply:

    धन्यवाद देवयानी‌, आपले म्हणणे बरोबर आहे, जर आपणच टिकवून नाही‌ ठेवली‌तर जग का स्विकारेल ? :)

    [Reply]

    Posted by शुद्ध मराठी

    Link | March 12th, 2010 at 4:17 pm

  2. हॅट्स ऑफऽऽ टू युवर हार्ड वर्क ब्रदर… तू खरेच अतिशय ग्रेट काम केलं आहेस!

    [Reply]

    Posted by विशाल तेलंग्रे

    Link | March 15th, 2010 at 4:29 pm

Leave Your Comment