मेड इन पाकिस्तान

विकएन्डला स्वच्छ सूर्यप्रकाश पडला होता आणि तापमान १-२ च्या आसपास होत, म्हणून खरेदीसाठी बाहेर पडता आलं. गेली कित्येक दिवस मी माझ्या मापाची‌ ज्या विशिष्ट रंगातली खाकी शोधत होतो, ती‌ मला ५३ स्ट्रीट वरच्या ओल्ड-नेव्ही मधे मिळाली. भारतात शासकीय गणवेशाच्या रंगामुळे, खाकी रंगाच्या पॅन्ट आपल्या वापरात शक्यतो नसतात, पण अमेरिकेत रंगाचा तो संकेत नसल्याने खाकी इतर रंगसारखाच वापरला जाते. मी पॅन्ट पाहिली, आवडली, फिटींग रूममधे ट्राय केली .. आणि हो एकोणतीस डॉलरची , त्यादिवशी‌ सतरा डॉलरला होती, म्हणजे मी घेतल्यातच जमा !

मी चेकआऊट काऊंटरपाशी, अगोदरच्या व्यक्तीचं चेकआऊट होईपर्यंत उभा असताना, सहज लेबलकडे लक्ष गेलं – Made in Pakistan, लेबल वरच्या त्या तीन अक्षरांमुळं मी‌ परत माघारी‌ वळलो, पॅन्ट रॅकवर ठेऊन दिली आणि शांन्तपणे निघून आलो.

वरील घडालेला प्रसंग एका भारतीय सहकाऱ्याला सांगत असताना त्याने प्रतिक्रीया दिली,
” क्या साला, तू भी‌ ना, ऐसा सोचेगा तो इधर जीना मुश्किल हो जाएगा “,
मी‌ त्यावेळी‌ फक्त हसलो , मनात वाटत होत .. हो रे मित्रा, बरोबर आहे, असाच जर विचार केला तर जगणं मुश्किल होईल, इथंच नाही‌, पण भारतामधे !

माझ्या जागी तुम्ही‌ असता तर काय केलं असतं ?

Related posts:

  1. इंडियन की चायनिज ?

Comments

  1. tumhi je kelat te barobar kelat.
    amcha purna group hech karato.amhi nahi ghet made in pakistan chya wasatu.
    Tyapeksha amhi Made in India chya wasatu gheto ani amhala anand hoto ki apalya deshala tyaja fayada hoto mhanun.

    [Reply]

    Posted by Leena

    Link | March 5th, 2010 at 7:33 am

  2. तू जे काही केले ते अगदी योग्यच होते. तुझ्या जागी मी असतो तरी हेच केले असते. ..Good decision

    [Reply]

    Posted by Sagar

    Link | March 5th, 2010 at 8:33 am

  3. Please read this

    http://jivanmulya.blogspot.com/2010/03/blog-post_05.html

    [Reply]

    मी Reply:

    सागर, तुझी ही पोस्ट मी वाचली होती. आपलं राजकारण, विचारकारण चुकीच्या दिशेने चाललय हे नक्की.
    १. जर्मनीत कोणी व्यंगचित्र काढतो आणि त्याचे पडसाद भारतात उमटतात.
    २. तस्लीमाच्या नावाने खोटा लेख येतो आणि समाज पेटतो

    पण भारताबाहेरील (आणि आतीलही) हिन्दूना मारलं तरी कॊणि चकार शब्द काढत नाही‌. :(

    [Reply]

    Posted by Sagar

    Link | March 5th, 2010 at 8:35 am

  4. त्या लेबल वरचे Made In एवढेच शब्द काढून पॅंट विकत घेऊन वापरली असती.

    [Reply]

    मी Reply:

    हो, नाहीतरी पॅट डोक्यावर थोडीच घेतात, ती xxx वापरतात. :)

    [Reply]

    Posted by शिरीष

    Link | March 5th, 2010 at 8:50 am

  5. mitra, mi pan made in pakistanchi kuthli vastu ghetali nasti…kadhich nahi..

    -ajay

    [Reply]

    Posted by ajay

    Link | March 5th, 2010 at 9:21 am

  6. मला खाकी रंगावर फार काही प्रेम नाही. कारण एक तर तो सरकारी असावा म्हणून किवा रंगातच “खाकी” आहे म्हणून.
    पण नक्कीच मी सुद्धा हे पाकिस्तानी चड्डी घेतली नसती अगदी फुकट असती तरी !!!

    [Reply]

    Posted by swapnil

    Link | March 5th, 2010 at 11:49 am

  7. Mitra, I feel u r 100% Correct. If u wud have seen the lable before trying it, i am sure u wud nothave even touched it. Thats right. Keep it up.!!!

    Jai Maharashtra

    [Reply]

    Posted by Rishikesh Bapat

    Link | March 5th, 2010 at 2:04 pm

  8. तुमच्या जागी मी असतो तर बिनधास्तपणे ती खाकी विकत घेतली असती आणि घरी आल्यावर ’ते’ लेबल कात्रीनं कापुन टाकलं असतं! :)

    [Reply]

    मी Reply:

    तू अमेरिकेत ये .. किंवा पुण्यात बसल्या बसल्या तिकडून इंपोर्ट करून , लेबलं कापून वापर .. :) ..

    [Reply]

    Posted by प्रभास

    Link | March 5th, 2010 at 2:32 pm

  9. अगदी अगदी डीट्टो सेम प्रसंग घडलाय माझ्या बाबतीत पण. तुम्ही केलंत ते १०१% योग्य आहे असं मी तरी म्हणीन.

    [Reply]

    Posted by हेरंब

    Link | March 5th, 2010 at 3:32 pm

  10. तिथे तुम्हाला हवी तशी मेड इन इंडिया किंवा मेड इन मेक्सिको पॅंट नव्हती का?…
    असायला हवी होती… किंवा ती महाग मिळाली असती १७ डॉलर्सपेक्षा!

    [Reply]

    मी Reply:

    आल्हाद,
    मला हवी‌असलेली‌ पॅन्ट फक्त मेड इन .. होत्या, अगदीच काय या सिझनचा त्यामॉडेलचा सर्व लॉट तसाच आहे. किंमत कूठे तयार झाली यापेक्शा त्या ब्रॅन्डला असल्याने दुसऱ्या शक्यतेचा प्रश्न येत नाही‌.

    [Reply]

    Posted by आल्हाद

    Link | March 5th, 2010 at 4:34 pm

  11. हेरंब, हृषिकेश, स्वप्निल, अजय, सागर, लीना
    तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद, मी केलं ते योग्यच केलं याची खात्री पटली.

    [Reply]

    Posted by मी

    Link | March 5th, 2010 at 7:07 pm

  12. तुम्ही जे केलंत तसं आम्हीही करतो. अमेरिकेत राहिल्याने विविध देशांच्या आयातीत वस्तू उपलब्ध असतात. आम्ही खरेदी करताना पहिल्यांदा ‘मेक’ पाहतो. हे तंत्र माझ्या नवऱ्याने मला शिकवले. त्यामुळे साहजिकच किमतीनंतर ‘मेक’ पहायची सवय जडली आहे. आम्ही ‘मेड इन इंडिया’ गोष्टी आवर्जून घेतो.
    आमच्या एका मित्राचे हे मत “तिकडे पण लोकच राहतात”, “एकदम मान्य कि लोकच राहतात पण ते आपल्या पैशाचा वापर वाईट गोष्टींसाठी करतात. खासकरून अशा वाईट गोष्टी जर मानव जातीविरुद्ध त्यातून माझ्या मातृभूमीत घडत असतील तर त्यासाठी मी अर्थसहाय्य का करावं?”, हा एक विचार.
    घरची RSS ची पार्श्वभूमी हेही काहीसा कारण आहे ह्या दृष्टीकोनामागे.
    पाकिस्तानने हि दुष्कृत्ये थांबवली तर ‘मेड इन पाकिस्तान’ गोष्टी विकत घेण्यावर मी फेर-विचार करीन. त्या देशातही गरिबी आहे. पण त्यांनी माझ्या देशात केलेली हानी क्षम्य मुळीच नाही. ती विसरून मी कोणताही निर्णय घेणार नाही.
    तुम्ही काहीही गैर केलेले नाही!

    [Reply]

    मी Reply:

    माझ्या मनात कदाचित अशाच काही भावना होत्या .. :)

    [Reply]

    Posted by Sampada

    Link | March 5th, 2010 at 7:12 pm

  13. बरं हीच भूमिका आम्ही ‘मेड इन बांगलादेश’ साठी ही ठेवली आहे.

    [Reply]

    मी Reply:

    अजून मी ‘मेड इन बांग्लादेश’ पर्यंत आलो नाही. बांग्लादेशमधील ‘ग्रामीण बॅन्क’ आणि त्यासंदर्भात काम करणाऱ्या संस्थांविषयी‌ मी चांगलं वाचल/ऐकलं आहे, पण तरीही विचार होईलच हे नक्की‌ !

    [Reply]

    Posted by Sampada

    Link | March 5th, 2010 at 7:14 pm

  14. पाकिस्तानातील भारतीय आणि दिलसे हिंदुस्तानी जनतेचे संरक्षण करायचे सोडून वरच्या खोट्या स्टीकरला भुललात…

    भारताच्या शेजारी अमेरिका लढतेय आणि तुम्ही पाकिस्तानातच आहात अजूनही…

    [Reply]

    Posted by शिरीष

    Link | March 6th, 2010 at 2:24 am

  15. विजारी(पॅन्ट) बाबत माहीत नाही, पण जर अंडर-पॅन्ट (आतली चड्डी) मिळाली तर तीच घेऊन घाला, अगदी बिल्ला (लेबल) न काढता
    :)

    तसेच तुमच्या सहकार्यांना देखील घाला !

    [Reply]

    Posted by चिव चिव

    Link | March 6th, 2010 at 4:06 am

  16. आदि !!(?)
    जिँकलस मिञा जिँकलस !
    आज औरंगाबादहून पुण्यात येताना तुझा पोस्ट वाचला !
    भारताने हाँकीत पाकिस्तानला हरवल्यावर फटाके वाजवणारा मी !
    पाकिस्तानवरील कुठलाही विजय हा आनंददायीच !
    तू राडा कमिटीचे नाव साता-समुद्रापार नेलेस, लेका आनंद वाटला !!

    [Reply]

    मी Reply:

    :)

    [Reply]

    Posted by चौ

    Link | March 6th, 2010 at 5:44 pm

  17. अगदी योग्य केलस
    मी पन नसति घेतलि

    [Reply]

    Posted by Amit

    Link | March 8th, 2010 at 1:41 pm

Leave Your Comment