आपली भाषा अस्थिर होतेय, आपल्या भाषेला बाकिचे दुय्यम लेखतायत, आपल्या भाषेची (आणि भाषिकांचीही) गळचेपी होतेय .. असे एक ना अनेक सूर आज आपल्याला ऐकायला मिळतायत, कदाचित तुम्हीही हेच रडगाणं गात असाल. सांखिकीच्या, सामाजिक मान्सशास्त्राच्या, इतिहासाच्या किंवा राजकारणाच्या दृष्टिकोनातून काय सत्य आहे हे पडताळण्याची गरज असेलही, पण एक मात्र नक्की … हे सगळे गळे मराठी बोलणारेच आहेत !
मनातल्या या शंकांवर काल विचार करत असताना एक माईंड मॅप तयार झाला. यातल्या ठळक कारणांवर नजर टाकता येईल :
१. भाषिक बाजारपेठ :
जिथे रिटर्न्स , तिथे इन्वेस्टमेंट, हा बदलत्या व्यावसायिक जगाचा पहिला नियम आहे. प्रत्येक उद्योजक त्याचं उत्पादन आणखी कसं विकल जाईल व नफा कसा वाढेल या प्रयत्नात असतो. उत्पादनविक्रीला जे काही अडथळे येतात ते निपटण्याची काळजी घेतली जाते .. मग तो अडथळा भाषेचा का असेना. याचं सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे युनिकोड अक्षरं पद्धती. विषेशत: युरोपीयन समुदायाचं युरो हे चलन अस्तित्वात आल्यानंतर एकाच वेळी अनेक भाषांमधे संगणन करण्याची प्रकर्षाने गरज भासू लागली व ही समस्या सोडविण्यासाठी अनेक बलाढ्य कंपन्यांनी निधी उभा करून युनिकोड एककांची निर्मिती केली. यात भाषा आणि व्यावसायिकता यांचा मेळ घातला जात असताना महत्वाच्या गोष्टी लक्षात येतात :
१. तेथील स्थानिक भाषांचा वापर – ‘उद्योजक ते उद्योजक (B-B)’ आणि ‘उद्योजक ते उपभोक्ता (B-C)’ या सर्व व्यवहारांमधे होतो.
२. ते काम त्या भाषेत करण्यावाचून अडलं होतं, व त्या अडवणूकीत कंपन्यांचं आर्थिक नुकसान होतं.
३. प्रकल्पातून मोबदल्याची शाश्वती
याच निकषावर आपण आत्मपरिक्षण केले तर पुढील प्रश्न उभे रहातात ..
१. संपुर्ण व्यवहारासाठी केवळ मराठीचा वापर करणारे B-B उद्योजक किती ?
२. किती , कोणत्या व्यवहारामधे मराठी-वाचून अडतय ? ( आपन अडून बसलो ? )
३. व्यावसायिक सेवांच्या मराठीकरणावर ‘रिटर्न ऑन इन्वेस्टमेंट’ किती ?
आणि एक सत्य समोर येते, ते म्हणजे महाराष्ट्रातल सत्ताकारण आणि सहकारी साखर कारखाने याशिवाय असलेल्या व्यवहारी जगातली अर्थसत्ता मराठी भाषेवर अवलंबून नाही, त्यामुळे व्यवहारी जगात मराठी भाषा म्हणून कमी पडते.
२. शैक्षणिक अंधश्रद्धा :
भारतीय मनाला साहेबाच्या रंगाचं आणि बोलीचं भलतच कौतुक. इंग्रजीत बोलणं म्हणजे शहाण्या माणसाचं लक्षण, हा समज गेली दिडशे वर्षात ‘जनुकांमधे’ इतका भिनलाय की आपण हाही विचार करायला विसरलो की – इंग्लंड/अमेरिकेतले वेडे इंग्रजीच बोलत असतील ना ?
केवळ इंग्रजी बोलणं वेगळं आणि स्वत:ची पंचैंद्रिय वापरून, त्याला तारतम्याची जोड देत विचारशक्तीला पणाला लावून कला-ज्ञान-विज्ञानच्या क्षेत्रात भराऱ्या मारणं वेगळं, याच भानच संपलय. याच गैरसमजातून निर्माण झालेली शैक्षणिक अंधश्रद्धा म्हणजे – इंग्रजी शाळांतून मुलांना चांगलं शिक्षण मिळेल. याच अंधश्रद्धेपोटी कित्येक पालक खिशाला न परवडणाऱ्या शाळांमधे मुलांना घालतात. याविषयावर एक वेगळंच ब्रेन-स्टॉर्मिंग होईल, पण जाता जाता काही प्रश्न :
१. तुमची मुलं ज्या शाळेत जातात ती शाळा एखाद्या राजकीय शिक्षण सम्राटाची तर नाही ना ? त्यातले शिक्षक कोणत्या भाषेत शिकले ?
२. मराठी शाळेपेक्शा असं काय जास्त इंग्रजी शाळेत शिकवलं जाईल असं पालकांना वाटतं, जे त्यांना मुलाला शिकवता येणार नाही ?
३. आज देशविदेशात उच्चपदस्थ व्यक्तीची शालेय शिक्षण कोणत्या माध्यमात झाले ?
४. इंग्लंड अमेरिकेत नावाजलेल्या महर्षी स्कूल प्रमाणे भारतातल्या इंग्रजी शाळांत वैदीक गणित, संस्कृत शिकवतात का ? का नाही ?
५. आपला पाल्य (फक्त) इंग्रजी बोलणारा पोपट करायचाय ?
३. भाषेचं राजकारण :
स्वातंत्र्यानंतर काही पक्षांनी त्यांच्या स्वातंत्यपूर्व इतिहासाचं भांडवल केलं आणि सत्ता मिळवली आणि उरलेल्यांनी सत्तेसाठी कारण शोधली.
अपवादात्मक चळवळी पक्ष सोडले तर इतर केवळ शंखच आणि यातला एक महत्वाचा मुद्दा म्हणजे – भाषेचं राजकारण !
१. जर मराठी भाषा ‘वर्ल्ड क्लास’ झाली तर आत्ता भाषेसाठी राजकारण करणारे नंतर काय करतील ? त्यांना खरच असं व्हावं असं वाटत असेल का ?
२. एक पक्ष भाषेचं राजकारण करतो आणि दुसरा पक्ष पहिल्याला नामोहरम करतो .. यात भाषासमृद्धी कशी होणार ?
३. पहिले दोने मुद्दे जर तुम्हाला पटत असतील तर त्याच्या अनुषंगाने खरच राजकारण आहे का ?
४. अ विज्ञान भाषा
आजच्या जगात वापरल्या जाणाऱ्या सर्व तंत्रज्ञानाचा शोध पाश्चिमात्य देशातला, मग विज असो, अवजड यंत्र असोत कि माहिती तंत्रज्ञान, मोबाईल फोन. हे सर्व तिकडून आल्याने त्या भाषेतले शब्द मराठीत येणार हे उघड आहे. त्यासाठी नव-नविन शब्द योजले तर उत्तम पण त्यामुळे भाषेवर आक्रमण झाले वगैरे समज करून घेण्यात काही अर्थ नाही. कारण ‘योगाला’ ‘डिव्हाईन-जॉईन-स्ट्रेचेस’ असा शब्द मी कुठे पाहिला नाही, तो इंग्रजी (व इतर) भाषांनी आहे तसा स्विकारला. गुरू , अवतार, बुद्धा, मंत्रा, धान हे शब्द भारतीय भाषांमधून/संस्कृतीतून जशेच्या इंग्रजीमधे गेले, … हो पण एक नक्की आजच्या जगातल ज्ञान विज्ञान हे मूळातून मराठी भाषिकांनी मराठी भाषेत संशोधन करून निर्माण केलं नसल्याने , त्यातील शब्द आपल्या भाषेत आलेत, हे वास्तव स्विकारायला हवं
५. शिक्षण सम्राटांची धोरणं
विना अनुदान सुरू केलेल्या इंग्रजी शाळांमधे रग्गड पैसा मिळतो हे लक्षात आल्याने नियम #१ नुसार याची बेसुमार वाढ आहे. हेच होत असताना चांगल्या दर्जाच्या शाळा मराठी माध्यमातून सुरू करण्याकडे दुर्लक्ष.
Related posts:



Great!
[Reply]
मी Reply:
March 4th, 2010 at 5:39 pm
Dhantawad Ashish !
[Reply]
Posted by Ashish
Link | March 4th, 2010 at 6:31 am
नाक दाबले की तोंड उघडते हा न्याय सगळीकडे लागू होतो तेव्हा इथेही व्यवहार्यच ठरतो… मुद्दा कोणताही असो…
[Reply]
मी Reply:
March 4th, 2010 at 5:39 pm
tond ughadanyapurvi Jeev jau naye mhanaje zal !
[Reply]
Posted by शिरीष
Link | March 4th, 2010 at 5:23 pm
बाजारपेठेतील भाषिक गळचेपी शहरी भागापुरती मर्यादीत आहे असे दिसते. तरी B-B उद्योजकांत केवळ मराठीचा वापर असण्यासंदर्भात शंका आहेच. शैक्षणिक बाबतीत बोलायच तर, आत्ताच्या पिढीमध्ये काही जणांमधे जी न्यूनगंडाची भावना होती ती पुढच्या पिढीमधे तुच्छतेची आहे. सिंबॉयसिस मधे शिकणारा पोरटा जेव्हा एखादा मुलगा मराठीत बोलतो म्हणून त्याच्याशी मैत्री करत नाही उलट घरी येवून त्याला गावठी म्हणून हसतो तेव्हा समज देण्याची वडिलमाणसांची जबाबदारी नाही का? बुद्धा, मंत्रा, ध्याना हे शब्द पाश्चिमात्यांनी सोयीनुसार आकारान्त करुन घेतले असले तरी आपणही तसाच उच्चार करण्याचे काहीच कारण नाही. रामायणा, महाभारता, पांडवाज असल्या नावाने चित्रपट मुलांच्या समोर का येत आहेत? भाषा संपणार ही खरी भिती नाही. तिचे मिंग्लीश परिवर्तन होण्याची खरी भिती आहे.
[Reply]
मी Reply:
March 5th, 2010 at 6:51 pm
हुश्श ! कोणितरी ही पोस्ट वाचली म्हणायची !!
बाजारपेठेतील भाषिक गळचेपी शहरी भागापुरती मर्यादीत आहे असे दिसते –> १०० बरोबर, कारण ग्रामीण मराठी भागात उद्योजकताच नाही (अर्थकारणावर प्रभाव पाडेल अशी, उदा. अमूल डेअरी ), ती वाढीला लागल्यास चित्र पालटेल.
तिचे मिंग्लीश परिवर्तन होण्याची खरी भिती आहे –> भिती असली तरी बाऊ करायचं कारण नाही, कारण भित्यापाठी ब्रह्मराक्षस. ज्ञानेश्वरांच्या काळातली मराठी आज आहे का ? नाही .. भाषा (जगातील सर्व ..) कालपरत्वे बदलते, हे सत्य आहे. मोगल राज्यांमुळे अनेक उर्दू, अरबी, फारसी शब्द मराठीत आले, ते इतके चपखल बसले की आज समजतच नाही, उदा. तारीख. :) .. यावर विस्तृत पोस्ट येईलच.
योग, मंत्रा –> मला हे सांगायच होतं की , त्यांच्या भाषेत आपले शब्द गेले तेव्हा त्यांनी ते ‘आकारान्त’ करत स्विकारले., पण आपल्या भाषेत दुसरे शब्द आले की आपल्याला वाईट वाटते. …
[Reply]
शिरीष Reply:
March 8th, 2010 at 5:39 am
त्यांनी आपल्या भाषेतील शब्द स्विकारताना “आ”कारान्त करून का स्विकारले?
ह्या बद्दल चिंतन आवश्यक. म्हणजे त्यांनी ते संस्कारित करून घेतले… की जे आपण सुद्धा शिकण्यासारखे आहे. याचा अर्थ आपलेच औषध आपल्याला पाजले जातेय आणि आपण मात्र तिकडून येणारे हलाहल? :-) शिवशंकराप्रमाणे संस्काराशिवाय प्राशन करतोय.
तेव्हा एकतर शंकराची भक्ती किंवा संस्करण आवश्यक आहे.
मराठीला जन्मतःच शंकराचे पाठबळ आहे… हे सूज्ञाने वेळीच जाणावे आणि भान ठेवावे…
[Reply]
मी Reply:
March 9th, 2010 at 12:05 am
washer-वायसर, monopoly – मोनापल्ली :) .. असे बरेच संस्कारित शब्द आपल्या बोलीत देखील सापडतील ..
[Reply]
शिरीष Reply:
March 10th, 2010 at 4:17 am
ते अपभ्रंशीत शब्द आहेत संस्कारित नव्हेत…
दोहींमध्ये फरक है।
[Reply]
मी Reply:
March 10th, 2010 at 1:09 pm
Aapan kele ‘apbhransh’ aani tyanni kele te Sanskar .. lai bhaari !
श्री Reply:
March 10th, 2010 at 1:19 pm
आपल्या शब्दकोषात जर आपण वायसर टाकला तर ती खरी रुजवात अन्यथा Guruvision आणि Gurudrushti मध्ये काय तो फरक…
मी Reply:
March 11th, 2010 at 1:54 am
शब्दकोष हे बोली भाषेचे प्रमाण मानू नये, कारण बरेच शब्द बोलीत, वापरात आल्यानंतर त्याचा त्या अर्थाने कोषात समावेश होतो. ‘संगणक’ हा शब्द बोलीत प्रथम आला नंतर तो अधिकृत समावेश झाला [असावा, आमच्याकडे मराठी शब्दकोश नाही, पण नामदेव गाथा आहे, तरी सुद्धा चुकभूल झाल्यास आपण शिरी आमुच्या लाथा चार ..मारूशकता ]
Posted by Meenal
Link | March 5th, 2010 at 9:53 am
भाषा कालपरत्वे बदलते, हे सत्य आहे.>> मान्य. पण इंग्लिशचा प्रभाव मूळ भाषेवर वाढतो आहे जे नक्कीच चिंतनीय आहे. ब्लॉग, नेट, कॉम्पुटर, मोबाईल किंवा तसेच अनेक अनेक शब्द कुरकुर न करता आम्ही पण वापरतोच की..तू म्हणतोस तसं विज्ञान भाषा असल्याने या गोष्टी अपरिहार्य होत्या/आहेत. ज्या जागी जी गोष्ट अस्तित्वातच नसते, तेव्हा मूळ ठिकाणची गोष्ट जशीच्या तशीच स्विकारवी लागते.(जसे त्यांना मंत्र किंवा योग स्विकारावा लागला आणि आपण चायनीज ताईची तशीच उच्चारतो)पण जिथे पर्याय आहे तिथे जास्तीत जास्त मराठीच/भारतीयच भाषा वापरावी असे मला वाटते.
[Reply]
Posted by Meenal
Link | March 6th, 2010 at 5:53 am
ब्लॉग मस्त आहे….. सर्व मुद्दे पटतात….. खरी गरज आहे ती जन जागृतीची….. आपण दुसऱ्यांचे प्रश्न विचारात घेत नाही…… जर स्वत:चे काही प्रश्न असतील तर पूर्ण तनामनाने सोडवतो….. तसा हा मराठीचा प्रश्न कोणी राज्यकर्ते किंवा बाहेरचे सोडवणार नाहीत… आम्हाला सोयीसवलती द्या म्हणून उपयोग नाही….. आपले आपण भाषा सक्षम करण्याचा प्रयत्न करावा… जर आपणच हा प्रश्न व्यक्तिगत पातळीवर घेऊन सोडवायचा प्रयत्न केला( म्हणजे दैनंदिनी व्यवहारात वापरणे, परिभषिक शब्द वापरणे अन्यथा मूळ शब्द वापरणे…..) तर हा प्रश्न सुटायला वेळ लागणार नाही!!!!!
[Reply]
मी Reply:
August 29th, 2010 at 8:55 am
अनिरुद्ध,
आपल्या प्रतिर्कीयेबद्दल आभार, या विषयावर आणखी नोटस टाकायच्या आहेत. आपलं म्हणणं बरोबर आहे. आपण काही केल्याशिवाय यावर प्रगतीहोणार नाही. माझे गेल्या आठवड्यातील अनुभव मी लिहितो आहे, जे या संदर्भात आहेत.
[Reply]
Posted by aniruddha paranjpye
Link | August 29th, 2010 at 8:23 am
नमस्कार सोमेश,
लेख छान आहे आणि माईंड मॅप द्वारे त्याचं विश्लेषणही छान केलं आहेस. फक्त मला त्यातला “गैरसमज” हा मुद्दा जरा अपूर्ण वाटतोय. मराठी शाळांची स्थिती जाणीवपूर्वक निम्न दर्जाची केलेली आहे. एकतर सध्याच्या सगळ्या मराठी शाळांना शासनचे अनुदान मिळत असल्याने एकाही शाळेत विना आरक्षण नोकर्या देत नाहीत. म्हणजे जर तुम्ही विशिष्ट पदवी घेतलेली असेल आणि राखीव जागा ज्या गटासाठी आहे त्या गटाचे असाल तर तुम्हाला शाळेत शिक्षक म्हणून नोकरी मिळते. बी एड च्या महाविद्यालयांमध्ये खूपच भयंकर परिस्थिती आहे. म्हणजे काहीही अभ्यास न करता विद्यार्थी आरामात वियो श्रेणीत पास होतात. (संस्थाचालक आणि महविद्यालयाचे प्राचर्य, शिक्ष वर्ग यांची कृपा). त्यामुळे शासकिय अनुदान असलेल्या मराठी शाळेत पालक आपल्या पालकांना घालण्यास उत्सुक नसतात. म्हणून मग ते इंग्रजी माध्यमा कडे वळतात. पुण्यात काही उत्साही लोकांनी एकत्र येवून मराठी माध्यमाची पण सेमी-इंग्रजीची शाळा काढली (न्यु इंग्लीश स्कूल टिळक रोड च्या आवारात भरते) त्या शाळेत शिकवायला चांगले शिक्षक ठेवले आहेत (म्हणजे ज्यांना शिकवण्याची आवड आहे, विषयाचे व्यवस्थित ज्ञान आहे आणि केवळ पाट्या टाकायच्या नाहीयेत) पण शासन त्या शाळेला मान्यताच देत नाहीत म्हणजे अनुदान नको असेल तरीही. पण हेच तशा प्रकारच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांना शासन मान्यता देते. म्हणजेच मराठी शाळांतील मुलांची संख्या आपसूक रोडावते आहे. त्यामुळे हळूहळू तेच चित्र आहे. हे म्हणजे अगदी सुरूवातीला लॉर्ड मेकॉलेने सगळ्या “गुरूकुलांचे” शासकिय अनुदान हळूहळू बंद केले आणि गुरूकुल पध्दतीचे उच्चाटन केले. त्यामुळे “गैरसमज” यातील काहीही गैरसमज किंवा राजकिय हेतूने पसरवलेले समज नाहीयेत. ते खरंच चालू आहे. सीबीएसई ची इतिहासाची पुस्तकं बघ. त्यांच्या सामाजिक शास्त्राच्या अभ्यासक्रम समितीवर २८ सदस्यांपैकी एकच महाराष्ट्रातील आहे पण मराठी नाही. मराठा साम्राज्याचा इतिहास तसेच एकूणच महाराष्ट्र यांना डावलले गेले आहे. कृपया माझा “शतपावली” वरचा यासंदर्भातील लेख वाचावा. http://shatapavali.blogspot.com/ पुराव्यांसहीत दाखवलं आहे. अजुनही याच संदर्भातील २-३ लेख लवकरच शतपावलीवर येतील. राजकारणी लोक सगळ्याचाच गैरफायदा घेतात कारण राजकारणी व्यक्ती आणि स्वार्थ हेच समीकरण सध्या आहे.
[Reply]
मी Reply:
August 29th, 2010 at 5:01 pm
अपर्णाताई,
वॉव … वॉव, चला माझ्या या नोटस कोणीतरी वाचतय तर ! कुठे सापडल्या तुला या ? यातल्या प्रत्येक नोडवर एकएक लेख लिहिण्याचा विचार त्यावेळी होता/आहे. त्यातील एकाच नोडवर लिहून झालय पण लिहिल्यानंतर कोणीही वाचल्या नाहीत आणि प्रतिक्रीयादेखील आल्या नाहीत त्यामुळे डोक्यातलं सगळं टाईप करण्याचा त्रास मी घेतला नाही.
तू म्हणतेस तो मुद्दा बरोबर आहे, ‘गैरसमज’ यानोडवर लिहून झालेले नाही आणि मॅपदेखील इवॉल्हिंग आहे. हा मुद्दा माझ्या लक्षात आला नव्हता, यावर पुढील मंथन करताना हे मुद्दे उद्घृत करेल.
[Reply]
Posted by aparnalalingkar
Link | August 29th, 2010 at 1:26 pm
अरे सोमेश,
मला ही पोस्ट फेसबुक वर एका व्यक्तीने पाठवली. तरीच बरंका मी जेव्हा प्रतिक्रीया लिहीली तेव्हा ४ मार्च वाचल्यासारखं वाटलं. पण येवढं लक्षात आलं नाही.
अरे यासंदर्भात अमृतमंथनवर प्रचंड चर्चा (घमासान) झालेली आहे. हे वाच: त्या आंतर्गत बरेच लेख आणि त्यावर चर्चा असं सगळं आहे. तुला नक्की उपयोग होईल.
http://amrutmanthan.wordpress.com/category/%e0%a5%a6%e0%a5%a9-%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%85%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%ad%e0%a4%be/
[Reply]
मी Reply:
August 29th, 2010 at 6:11 pm
अरे वा, बरच खाद्य आहे ! आणि फेसबुकवरून मामॅ जातोय हे ऐकून आनंदच वाटला. आज माझा याच विशयावरचा अनुभव टाकला आहे.
[Reply]
Posted by Aparna Lalingkar
Link | August 29th, 2010 at 6:02 pm
सोमेश तुझा लेख कुपचा सुंदर आहे आणि तुला मिळालेल्या प्रतिक्रिया सुधा खूपच विचार करआयला लावणार्या आहेत॰ या प्रशनाला अनेक बाजू आहेत। त्यातली अजून नवीन बाजू म्हणजे मराठी लोकांचे सिद्धांत आणि समजुती आणि गेरसमजुती॰ या वर पू ल देशपांडे यांचे येक शून्य मी या पुस्तकातील मराठी दृष्टीकोणातून मराठी माणूस हा लेख वाचणे खूप सुंदर आहे आणि त्यावेर तुझी मते सांगणे
धन्यवाद
निलेश
[Reply]
Posted by निलेश शित्रे
Link | September 5th, 2010 at 11:06 am