पेट रॉक :: पाळीव दगड !

Usb pet rock

Usb pet rock

परवा ऑफिसमधे एका सहकाऱ्याच्या टेबलवर एक दगड ठेवलेला पाहिला आणि त्या दगडापासून एक वायर निघून ती‌ त्याच्या वर्कस्टेशन लॅपटॉपला जोडलेली‌ होती. एकंदर तो प्रकार बघून मला रहावलं नाही‌ आणि मी‌ शेवटी‌ त्याला ‘हे नक्की‌ काय ?’ असा प्रश्न विचारलाच. त्यावर – ” अरे हा usb pet rock आहे, मला x-mas gift म्हणून मिळालाय, पण तुला पेट रॉक माहित आहे ना ?” असं म्हणत त्याने पेट रॉक वृत्तांत सांगितला आणि ‘त्या’च्या सारखा usb pet rock ऑनलाईन कसा मागवायचा हेही‌ सांगायला तो विसरला नाही.

सासवडला घरी एक हौसेने आणलेला ‘पेट’ असल्याने पेटरॉकवर थोडी‌ गूगलाई‌ केली, तर एकेक ‘ऐकाव ते नवलच’ या पठडीतील माहिती‌ समोर आली‌. Pet rock हे Gary Dahl या जाहिरात क्षेत्रातील एका भन्नाट माणसानं काढलेली‌ अमेरिकेतील, ७०च्या दशकातील टूम-खूळ ! एकदा एका मित्राबरोबर तो प्राणी पाळताना होणारा त्रास आणि त्याला तो का आवडत नाही‌ याविषयी‌ गप्पा मारत होता. आणि या समस्येवर त्याच्या म्हणे एक उपाय आहे , तो म्हणजे अर्थात पेट रॉक-पाळीव दगड .. असा ‘पेट’, ज्याची‌ कमीतकमी‌ काळजी‌ घावी लागेल, त्याला फिरायला न्यायची‌ गरज नाही, त्याला आंघोळ घालायची‌ चिंता नाही, त्याला खाण्यापिण्याची गरज नाही‌ .. आदी‌ आदी‌. गमती-गमतीमधे चाललेला हा संवाद त्याने इतका सिरियसली‌ घेतला की‌ त्याने Rock Bottom Productions ही‌ पेट रॉक सप्लाय कंपनी चालू‌ केली‌ आणि $3.95 ला एक याप्रमाणे पेट-रॉक विकून तो कोट्याधीश झाला. एका झकास अशा बॉक्समधे तो पेट, ३२ पानी‌ माहितीपुस्तकासह विकण्यात यायचा. बॉक्सला ‘श्वसना’ साठी म्हणून छिद्रदेखील असायची‌…

पेट रॉक

पेट रॉक

तुमच्या आमच्यासारख्या संगणक-ग्रस्तांसाठी usb pet पाळायला हरकत नाही, इथे एक गमतीशीर लिन्क आहे ज्यावर फायदे लिहिले आहेत : http://www.usbpetrock.net/… अर्थात ‘युज व्हॅल्यू’ नसलेल्या या प्रॉडक्टचं खूळ मागे पडलं, पण यानंतर गॅरी हा कायमचाच एक ‘मोटीवेशनल आयकॉन’ झाला, ज्याने साधी‌ कल्पना खूळ एका भन्नाट प्रकारे कॅपिटलाईज करून मजबूत पैसे कमवले आणि हे करायचं कसं यावर पुस्तक देखील लिहिलं.

याशिवाय खालील दुव्यांवर भेट द्यायला हरकत नाही‌ :

http://en.wikipedia.org/wiki/Pet_Rock
http://www.thinkgeek.com/geektoys/cubegoodies/c208/
http://www.virtualpet.com/vp/farm/petrock/petrock.htm

Comments

  1. भन्नाट. कॉन्सेप्ट आवडली

    [Reply]

    मी Reply:

    हो रे ..
    एकंदर सगळा प्रकार ‘खूळचट’ या सदराखाली येत असला तरी मला कौतुक वाटत ते त्याच्या धाडसाच. युज़ व्हॅल्यू‌ नसलेला माल घेऊन बाजारात उडी‌ मारायची‌ आणि त्याची‌ युजेबिलिटी दाखवून द्यायची‌ याला खरच धाडस म्हणाव लागलं. अर्थात यात तशी‌ गुंतवणूक नगण्य होती‌ त्यामुळं हे शक्य झालं .. पण तरीही‌ हॅट्स ऑफ !

    [Reply]

    Posted by Amit Borkar

    Link | January 27th, 2010 at 2:10 pm

  2. द गड (the garh). हा कुठला गड? महाराजांनी आग्र्याहुन सुटका झाल्यावर एकूण ५३८ गड ताब्यात घेतले होते असे एका शिवप्रेमी माणसाने सांगितले अलिकडेच…
    त्यातून १ कमी केला तरी ५३७ = 5+3+7 = 15
    मिले सुर मेरा तुम्हाला सूल बने म्हारा…
    पण काय आहे की म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावतो म्हणून हा कुठला द गड ते सांगाच की हो राव…

    [Reply]

    मी Reply:

    महाराज याविषयी कधी‌ माझ्याशी‌ बोलले नाहीत ..

    [Reply]

    Posted by शिरीष

    Link | January 29th, 2010 at 2:07 pm

Leave Your Comment