पर्णपाचू सावळा सावळा |
विठ्ठल माझा मळा, मी वारकरी आंधळा ||
त्यादिवशी सकाळी सकाळी थोडा लवकरच मी ‘त्या’च्याकडे गेलो, तर ‘भालू’मधलं हे त्याचं आवडतं गाणं त्याने त्याच्या पीसी वर लावलं होतं आणि स्वारी मजेत खापरी पाटिवर पेन्सिलने काहितरी लिहित होती. त्याला मी कधीच देवपूजा करताना किंवा साधे हात जोडताना सुद्धा पाहिला नव्हता, तरी एवढी तल्लिनता पाहून मी उगाचच विचारलं ..
“पूजा वगैरे उरकलं वाटतं “,
झटका बसावा तसा तो म्हणाला
“ना.. मी नाही पूजा करत ..”
मग ?
“अरे कर्म हीच आपली पूजा, आपल्या फिल्ड मधे देव शोधता आला पाहिजे, रोज जे करतोस त्यात दडलेलं अध्यात्म शोधलसं तर कामाचा कधीच कंटाळा येणार नाही, गंमत वाटेल .. हे गाणं निट ऐक, काय भन्नाट लिरिक्स आहे ते बघ .. वा…विठ्ठल माझा मळा .. मी वारकरी आंधळा .. !”
” पण सी++ आणि कॉम्प्युटरमधे … हे सगळं कसं असेल ?”,
कॉम्प्युटर म्हणजे लेटेस्ट मूव्हिज, हॉट वाल्पेपर्स व क्रेझी गेम्स आणि सी++ म्हणजे कसातरी सोडवायचा एक पेपर, या विश्वात असलेल्या मला त्याचं सांगणं झेपलं नाही, म्हणून मी विचारायला सुरूवात केली, तोच त्याने एक प्रश्न विचारला ..
” मला सांग कॉम्प्युटरवरचा टेक्स्ट एडिटर, इमेज पेंट यातून तयार झालेल्या, गाणी आदी फाईल्स, या जेव्हा हार्डडिस्कवर लिहिल्या जातात तेव्हा त्या कोणत्या स्वरूपात असतात रे ? ”
” बायनरी .. शून्य आणि एक या स्वरूपात “, मी.
” या सर्वांना दाखविण्याचे काम करणारी सॉफ्टवेअर्स, एक्झिक्युटेबल्स ..”, तो.
” सेम ..” ,मी .
” आता सांग हे सगळ फक्त ‘एका’पासून निर्माण झालय असं मी म्हटलं तर चुकीचं आहे का ? कारण शून्य म्हणजे अंक नव्हे, तर अंकाची अनुपस्थिती .. आणि असं जर असेल तर ‘एकोSहं, बहुस्याम:’ हा नियम इथेही लागू झाला ना ? आणि हाच नियम वेदकालापासून परमेश्वराबद्दल सांगितला जातोय , हो ना ?”
मी शांतपणे ऐकत होतो,
” आणखी पुधे जाऊन विचार कर, दिसणारी चित्रं, गाणी, लिहिलेलं हे सर्व ‘एक’च आहे, हे तुला समजतय पण जर दुसऱ्याला सांगितलस तर त्याला ते झेपणार नाही, तुला त्यात बायनरी कोडस दिसतील पण बाकीच्यांना दिसणार नाहीत. देव आणि त्याला जाणणारे संत यांच पण असंच आहे ना रे ? ते सांगतात ते लोकांना समजत नाही.”
” चल, बाकीचे येतील.. तुला एकच शेवटच उदाहरण देतो, तू ऐकलं असशील इंटरनेटवर ठेवलेल्या फाईल्स एकाच जागी असतात ना ? पण तरीही त्या जगातून कुठेहीपहाता येतात ना रे .. अगदी सर्वव्यापी ! ”
…….
मला अजूनही संभ्रम आहे त्यादिवशी माझ्याशी सॉफ्टवेअर इंजिनिअर अध्यात्माविषयी बोलत होता की अध्यात्मिक अभ्यास करणारा संगणकाविषयी , हे मला अजूनही उमजले नाही, ‘तो’ अगम्य होता हे नक्कीच. !
माहित नाही का पण त्या दिवसानंतर सॉफ्टवेअर प्रोग्रामिंग हा माझा आवडता नाही तर श्रद्धेचा विषय झाला, आजही हजारो ओळीचे सॉफ्टवेअरचे कोड मला पवित्र ग्रंथांसारखे वाटू लागतात, त्यामुळे जुन्या लिहिलेल्या ओळीची हाताळणी काळजीपूर्वक होतेच, शिवाय नविन लिहितानाही योग्य ती काळजी घेतली जाते … काम करताना ‘त्या’ची आठवण होते .. अन उगीचच आपण वेदकाळातले ऋषी असल्यासारखं वाटून जातं ..
Related posts:


अप्रतिम!!!!!
खरंच ’तो’ ही व्यक्ती आहे, की हे तुम्हालाच सुचतं?
असेल तर ’त्या’ला अन्यथा तुम्हाला एकदा प्रत्यक्ष भेटेन म्हणतोय. :)
[Reply]
मी Reply:
January 22nd, 2010 at 2:06 pm
Good Question !
[Reply]
Posted by प्रभास गुप्ते
Link | January 22nd, 2010 at 6:41 am
kharch apratim..
[Reply]
Posted by yog
Link | January 24th, 2010 at 11:53 am