सकाळी सकाळी कॅफेटेरीयात तो कॉफी पित असताना अचानक ती प्रकट झाली.
तिला असं अचानक हसतमुखानं समोर पाहून त्यालाही आश्चर्य वाटलं.
” काय लेटर घेतलं ना ? मग अप्रॅझल कसं झालं यावेळी ?
ए सांग ना, किती पर्सेंट ? ” .. त्याच हसर्या मुखातून !
” तेवीस टक्के ! “, गालावर साधारण दोन टक्के स्माईल आणत त्याने सांगितलं, कधी नव्हे ती आज स्वत:हून कशी बोलली याचा उलगडा झाला होता.
” ए .. कालची उतरली नाही वाटतं, का आम्हाला सांगायचं नाही ? खरं सांग ना. ” – ती, चेहरा थोडा सिरिअस करून.
” अगं पर्सेंट काढले नाही पण साडेचार च्या आसपास ..” – तो.
” तुलाSS ??? आणि फक्त साडेचार पर्सेंट .. ?? तू मला खुळ्यात काढतोय का, जा नको सांगू .. ”
हे वाक्य ऐकून हाच हादरला, तिला काहीच रूचत नव्हतं ना तेवीस ना साडेचार, शेवटी
समोरच्या त्या ललनेचा चेहरा पाहून याने मधला आकडा सांगितला ..
” तुला म्हणून सांगतोय .. साडेचवदा ! ”
” हं .. तेरा पर्सेंट पेक्षा जास्त कुणालाच मिळाली नाही, आतली बातमी आहे आणि तू साडेचवदा सांगतोय .. खरं सांगितल तर काय बि.घ..ड…त….य … का …. ?
.. हे वाक्य बोलता बोलता अर्धवट पिलेल्या कॉफीचा कप तिने बिनमधे भिरकावला आणि पाय आपटत निघून गेली, का ते माहीत नाही पण पुढे दोन आठवडे ती त्याच्याशी एकही शब्द बोलली नाही.
कळत नकळत बुद्धदेवांची आठवण होते आणि मनाला प्रश्न पडतो,
“खरच माणसाच्या दु:खाचं कारण काय आहे बर ? ”या वेदनेचं मूळ आपल्याला ‘किती मिळालय’ यापेक्षा शेजारच्याला ‘आपल्यापेक्षा जास्त मिळालय’ यात असेल का ? असेलही,
पण त्याहीपेक्षा जास्त दु:ख , ‘ त्याला जास्त मिळालं असेल’ .. या कल्पनेत मात्र नक्कीच आहे !
Related posts:


Ticha madye n tyacha madye kay relation ahet te jar Post madye mention kele asate…tar comments dene jast sope zale asate….
[Reply]
मी Reply:
November 17th, 2009 at 4:25 am
टिम-मेट !!
[Reply]
Posted by Sandip
Link | November 17th, 2009 at 4:21 am
As baryachada ghadatana pahile aahe aaju bajula… :)
[Reply]
मी Reply:
November 17th, 2009 at 5:13 am
ho re, baryaach companymadhe, baryachvelaa, baryaachJannachya aajubajula hot asat as.. my Mother, she is retired now, was doing blue-coller job in food processsing factory, she has also reported same nature of humanbng ..
[Reply]
Posted by rAHUL
Link | November 17th, 2009 at 5:08 am
haha
खरं सांगितल तर काय बि.घ..ड…त….य … का …. ? हे नुसतं वाचून कानात घुमलं माझ्या. झाकास.
[Reply]
मी Reply:
November 18th, 2009 at 12:03 am
असं तोडून लिहिण्याचा थोडासा नविन प्रयत्न केला, कानात घुमलं म्हणजे नविन प्रयोग जमला .. प.र..त… लिहायला हरकत नाही :)
[Reply]
Posted by अभी
Link | November 17th, 2009 at 5:42 pm
ह्या post मधील “तो” तुझ्या परिचयातील आहे काय?
[Reply]
मी Reply:
November 19th, 2009 at 2:18 am
Changalaach ..
[Reply]
Posted by स्वप्नील दगडे
Link | November 18th, 2009 at 12:58 pm