सोमवार सकाळ म्हणजे प्रत्येक सॉफ्टवेअर इंजिनिअरसाठी जिवघेणा प्रकार वाटतो, सुरूवातच मुळी होती शुक्रवारी संध्याकाळी अमेरिकन, युरोपीअन क्लायंटने पाठवलेल्या ईमेल्सने ! नंतर साप्ताहिकी .. म्हणजे विकली मिंटींग.या मिंटींगमधे मुख्यत्वाने मागिल आठवड्याचा आढावा घेणे आणि या आठवड्यासाठी नियोजन करून काम करणे हा उद्देश असतो.मिटींगमधे मागिल आठवड्यात केलेल्या कामाची उजळणी, ते करताना आलेले इश्यूज, एखाद्या टास्कला विलंब झाला असेल तर त्याचं कारण, तो सोडवण्यासाठी या आठवड्यात असलेलं टिमचं नियोजन, या आठवड्यात नव्यानं करण्याच्या कामांची उजळणी याशिवाय प्रोजेक्ट टेस्टींग फेजमधे असेल तर इश्यूट्रॅकरवर लॉग होणार्या इश्यूजवरील कामाचे नियोजन आणि एकंदर या सर्वांच्या प्राधान्यक्रमाची निश्चिती करणे ज्याला बोलीमधे ‘प्रायोरिटी सेट करणे’ म्हणतात .. इ. गोष्टी असतात. मिंटींगच्या या नोंदी प्रत्येकजण कागदी वहीमधे लिहितोच पण कुठेतरी प्रत्येक गोष्ट वहिमधे लिहिण्यावर बंधन येतात, मागे जाऊन प्रत्येक छोट्या गोष्टंची नोंद त्याच जागेवर अपडेट करणं होत नाही. याशिवाय वैयक्तित कामांची [ बील भरणे, एजंटला फोन करणे आदी ..] नोंद वहित नसते त्यामुळे त्या गोष्टी करणं कदाचित विसरू शकतो.
एक सुमार बुद्धीमत्तेचा म्हणून मला या सगळ्या गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेऊन करण अवघड होऊन बसल्यावर गंमत म्हणून मी माझा TODO माईन्डमॅपमधे लिहायला सुरूवात केली हे मी मागिल पोस्टमधे लिहिलच होत पण आज मी नमुन्यादाखल मी एक माईंडमॅप इथे शेअर करतोय, तुम्हाला जर आवडाला तर नक्की वापरून बघा.
१. टास्कचं वर्गिकरण आणि प्रायोरिटी :
xmind मधे वेगवेगळ्या टास्क वेगवेगळ्या नोडसखाली टाकता येतात. त्यामुळे आठवड्यात करायच्या संपुर्ण कामाची ब्ल्यूप्रिंटच डोळ्यासमोर राहू शकते. नोडच्या प्रॉपर्टीज सेट करताना त्यांच्या प्रायोरिटीज क्रमांकाने सेट करता येतात. उदा. बगट्रॅकर इश्यूज नोडमधे बगट्रॅकर लॉग झालेले इश्यूज ज्यावर मला काम करायचय त्याची लिस्ट आहे. मिटींगमधे मॅनेजरकडून त्यांच्यावर काम करण्याची प्रायोरिटी समजली होती ती तिथे लिहिली आहे.
२. स्टेटस अपडेट :
झालेल्या इश्यूजचं, टास्कंच status – completed असं आहे तर ज्यावर काम सुरू आहे त्याचं त्यानुसार आहे. xMind मधे नोडसना ग्रुपींग देखील करता येते. संदर्भातले बग एकाच ग्रुपमधे ठेवले आहेत, तसेच Summary लिहिण्याची सोय असल्याने तिथे समरी डकवून किंवा संदर्भातला प्रश्न लिहून दुसर्या दिवशी ऑफ्शोअर टिमला सांगता येतो. याचा फायदा टेलिकॉलमधे जेव्हा प्रश्न विचारले जातात तेव्हा होऊ शकतो.
३. व्यक्तिगत संदेश, मेसेंजर वर सांगण्यासाठी :
याला हे सांगायचय, त्याला ते सांगायचय .. आदी अनेक गोष्टी असतात उदा. काल चेक-इन केलेला कोडवर नजर टाक, युनिटटेस्टींग मधे एखाद्या कोड गंडलेला [क्यू'सॉफ्ट मधला शब्द] असतो.. बर्याच वेळ्या त्या विसरल्या जातात, त्यादेखील नोंदून ठेवता येतील.
४. चिंत्रमय आठवण :
xmind मधे नोडस छान-छान आयकॉन लावता येतात. वरील मॅपमधे टेलिफोन बिल भरायची एक टास्क आहे आणि दुसरी Car कंपनीला फोन करण्याची. त्या आठव्ड्यात त्या दोन्ही झाल्यावर मी त्यांना कंम्प्लिट मार्क केलं होतं. टॉस्कला हे आयकॉन जोडल्याने त्या गोष्टी नजर खेचून घेतात व समोर फोन असेल तर टास्क उरकली जाते. :)
५. नविन मॅपची लिन्क :
कोणत्याही नोडवरून Ctrl+Alt+T नवीन मॅप करता येतो. म्हणजे तयार होणारा नवीन मॅपचा मध्यवर्ती विषय ती नोड असते.चित्रात ‘वेब कनेक्षन टाईम’ यानोडपुढे असलेले C हे अक्षर त्याची खूण आहे.
५. इतर गोंष्टीं :
याशिवाय इतर अनेक छोट्या-छोट्या गोष्टी असतात ज्या काम करताना लक्षात येतात पण नंतर रिपोर्ट करण्याच्या विसरून जातात, काही सजेशनस, विशलिस्ट आदी मुद्द्यंची नोंद xmind वर हातोहात ठेवता येऊ शकते.
या पद्धतीने टास्कची व्यवस्थित मांडणी करून एकेक हातावेगळी करण्याच्या पद्धतीला GTD – Getting Things Done, असे म्हणतात. यावर डेव्हिडआलेनने याच नावाचं पुस्तक देखील आहे, आणि GTD साठी माईंड मॅपचा अशा नोंदींसाठी उपयोग करताना सर्वात मोठा फायदा म्हणजे संपूर्ण टास्कसचा एकाच नजरेत होणारा Review आणि दुसरा म्हणजे आनंद .. गंमत !
टिप :
१. यामधे दिलेल्या नोंदी सॉफ्टवेअर इंजिनिअरच्या दृष्टीकोनातून दिलेल्या असल्या तरी इतरांना देखील xmind चा उपयोग थोड्या फार फरकाने असाच करता येईल.
२. सदर माईंडमॅप हा माझ्या रोजच्या वापरातील मॅपमधून काही नोड्स घेऊन उदाहरणादाखल केलेला आहे, त्यातील नोंदीचा आणि मी नोकरी करत असलेल्या ऑफिसमधील प्रोजेक्टचा काही एक संबंध नाही.
Related posts:



[...] is an example from my friend Somesh, who seems to have made it as an integral part of his daily thinking. Categories: Mind Maps [...]
Posted by Life…it makes sense » Mind Map – A useful tool
Link | March 8th, 2010 at 1:34 pm