ऍरेन्जड् मॅरेज :: स्थळं पहाताना पडलेले प्रश्न

सध्या या देहाची ‘यंदा कर्तव्य आहे’ ही अवस्था असल्यामुळे मागील महिन्यात भारतात गेलेवेळी काही स्थळं पाहणं झालं. खर तर ‘मुली पाहणं’ यापेक्षा मुलींना भेटणं हाच शब्द मला उचीत वाटतो आणि मुलींना भेटल्यावर, त्यांच्याशी बोलल्यावर या कार्यक्रमाला ‘स्वत:ला मुलींना दाखवणं’ हेच नाव मला उचीत वाटलं .. या भेटींदरम्यान मी काही प्रश्न विचारले, काही प्रश्न मुलींनी विचारले, काही प्रश्न मनातल्य मनात निर्माण झाले.

‘ मुलीकडून अपेक्षा काय आहेत ? तूमचा देवावर विश्वास आहे का ?, तुमचं एकत्र कुटूंब आहे का रे ? तुझं काम करण्याचं डोमेन आणि टेक्नॉलॉजी कोणती ? पुण्यात फ्लॅट नाही ? मला सासवडला जमणार नाही. स्वत:ची कार असेलच ना ? मग किती मुली बघीतल्या आतापर्यंत ? तिकडे म्हटल्यावर ड्रिंकिंग आणि स्मोकिंग .. ? अमेरिकेत कायमच रहाणार का, लगेच जाणार का ?

हे प्रश्न ऐकून माझे मलाच प्रश्न पडले .. साला माझे ग्रहयोग काय आहेत लग्नाबाबत ? .. हे असल्यांना भेटत बसण्यापेक्षा कुठे टाका भिडतोय का .. ? ;)

याच्यावर कधीतरी खुसखुशीत मोठा लेख होऊ शकेल, आत्ता फक्‍त माईंडमॅप शेअर करतोय ..

लग्न आणि प्रश्न

लग्न आणि प्रश्न

Related posts:

  1. ऍरेन्जड् मॅरेज :: लाईफ सायकल (एसडीएलसी स्टाईल)
  2. ऍरेन्जड् मॅरेज :: एक मुरवलेला प्रश्न !
  3. माईंड मॅप :: सॉफ्टवेअर इंजिनिअरसाठी ( इतरांसाठीही )

Comments

  1. mala vatata tujhi ane majhe grah ekach vatevar aahet. nukatach mi hi ashich ek post takli ahe, mind map jabri ahe ree kharach

    -ajay

    [Reply]

    मी Reply:

    हो रे .. :) तुझा अनुभव पण ‘चकाट्या’ लिहिलायस. मी मागे वाचला होता. जमलं की पत्रिका पाठवायला विसरू नका !!

    [Reply]

    Posted by Ajay

    Link | November 5th, 2009 at 6:07 am

  2. “स्वत:ला मुलींना दाखवणं” – मित्रा, हे एकदम बरोबर आहे.
    हल्ली मुलीच मुलांना प्रश्न विचारतात…
    ( काय करणार आधीच मुली कमी आहेत )

    [Reply]

    मी Reply:

    तुम्ही भेटा-भेटी चालू केली का नाही ?

    [Reply]

    Posted by स्वप्निल दगडे

    Link | November 5th, 2009 at 12:15 pm

  3. वरील सगळ्या गोष्टींशी सहमत. हल्ली मुली मेजॉरिटीमध्ये आहेत. आपण आपले Minority किंवा अपक्ष. त्यामुळे त्यांना वाटले तर आपण संसाराच्या सत्तेत.

    Nice diagram…

    [Reply]

    मी Reply:

    अभिप्रायाबद्दल धन्यवाद,
    खरं तर या सगळ्याचा उद्देश एकमेव उद्देश आहे .. क्रियेटिव्ह थिंकिंग, व्हिजुअल थिंकिंग, रेंगाळलेल्या मनाला चालना .. जी चित्रातून, माईंडमॅपमधून प्रकट होते.

    [Reply]

    Posted by सिद्धार्थ

    Link | November 5th, 2009 at 1:57 pm

  4. मित्रा,
    त्यापेक्षा मुलगी पटव. लव्ह मॅरेज कर. बरेच प्रश्न निकालात निघतील.

    [Reply]

    मी Reply:

    माहित नाही .. पण माझा एक मित्र आहे त्याने सुमारे २ वर्ष मुली पाहिल्या हे करत असताना अचानक कोणतरी भेटली , ते प्रेमात पडले आणि इतक्या मुली बघून शेवटी लव्ह-मॅरेज केलं ..

    .. बाकी ‘मुलगी पटव’ .. हे मात्र पटलं ..

    [Reply]

    मी Reply:

    असं सांगणारे बरेच जण मात्र एरेन्ज मॅरेज करतात ही एक गंमतच आहे ..

    [Reply]

    Posted by कांचन कराई

    Link | November 5th, 2009 at 2:02 pm

  5. कांचनचं म्हणणं पटलं!
    इतका त्रास कशाला द्यायचा घरच्या लोकांना, की मुलगी पहा, वगैरे… सगळं आपलं आपणच जमवायचं.. बस्स! घरचे लोकं नंतर हो म्हणतिलच.. आणि हो, एखादं सुरवंट लहानपणीचं लक्षात असेल तर बघा, कदाचित आत्तापर्यंत फुलपाखरु पण झालं असेल :D ..
    शुभेच्छा… कळवा आम्हाला कुठे काही जमलं तर!!

    [Reply]

    मी Reply:

    अहो काका,
    आमच्या लहानपणी सुरंवंट नव्हते, ‘वरवंटे’ च होते सगळे ..
    अर्थात जमलं तर माझ्या वहीमधे काहितरी नोंद होईलच आणि त्याचे तरंग तुमच्यापर्यत नक्की येतील, शुभेच्छांबद्दल आभार ..

    [Reply]

    Posted by Mahendra

    Link | November 5th, 2009 at 3:58 pm

  6. लव मॅरेज केल तर काम सोपे होइल अस वाटत असेल तर चूक आहे :)
    “लग्नाचा आधी असा न्हव्ता वागस” हे व्याक्य आयुष्यभर ऐकाव लागेल.

    [Reply]

    Posted by Amit

    Link | November 6th, 2009 at 5:23 am

  7. सोमेश,
    यावरुन मुलीचा माईंड मॅप तुला पाठवला आहे.
    या मॅपची हसरी मुलगी बघुन बरे वाटले. पण तिच कुंकू किती मोठं काढल आहेस? :)
    वहीमधले तरंग पोहोचवत रहा.

    [Reply]

    मी Reply:

    मीनल,
    हे हे .. माईंड मॅप पोचला, वाचला. भन्नाट आहे. खरं तर वहीमधे काढलेलं हे त्या क्षणाची उत्स्फुर्त निर्मिती असते, ठरवून काहिच नाही त्यामुळे यावेळी चेहरा हसरा निघाला. खरं तर मी एकांन्तात वहीशी बोलत अस्तो तेव्हा मनातलं उतरवणं हा उद्देश असतो .. मग ते माईंड मॅप किंवा व्हिजूअल थिंकिंग वा सलग लिहिलेली पानं. इथे चित्र काढणं हा उद्देश नसतो .. आणि काधलेली विचारचित्रे, एकरेषी असतात त्यामुळे त्यात चित्रकलेची अचूकता येत नाही .. कारण उद्देश तो असतोच .. :)

    [Reply]

    Posted by meenal

    Link | November 6th, 2009 at 9:50 am

  8. Hi,

    Thanks for your reply,

    Mee tuja naveen mind map baghitala.
    doodlescha rekhatan atishay chan ahe.

    naveen mindmap chi vaat baghtoe.

    Thanks,

    Gurunath

    [Reply]

    मी Reply:

    गुरूनाथ,
    डूडल्स, माईंड मॅप आणि व्हिजूअल थिंकिंग हे खरं तर क्रीएटिव्हिटीचे वेगवेगळे पैलू आहेत .. पण मीनलला दिलेल्या उत्तराप्रमाणे ते वहीमधे एकत्रपणे येतात .. मी शांतपणे बसून वहीशी बोलतो तेव्हा वहीतला मॅप उतरतो अथवा नोंद होते. परंतु याशिवाय तुम्ही सांगितल्याप्रमाने माईंड मॅपींग आणि कल्पकतेवर लिहिण्याचं डोक्यात आहे .. तुमची नियमित भेट आणि पाठपुरावा मला लिहायला भाग पाडेल कदचित ..
    धन्यवाद ..

    [Reply]

    Posted by Gurunath Kajalkar

    Link | November 7th, 2009 at 7:15 am

Leave Your Comment