माईंड मॅप :: ओळख

इंग्रजी भाषेत An empty mind is अ devil’s workshop अशी एक म्हण आहे आणि खरोखरच ती खरी आहे, याचा अनुभव मला ‘गोर्‍या पाण्याच्या’ शिक्षेदरम्यान आला. रिकामं मन जसं सैतान तसच अनेक विचारांनी भरलेलं , अनेक todo मधे अडकलेलं मनही घातकचं, कारण त्यामुळे “एक ना धड भाराभर ..” अशी अवस्था होऊन हातातल्या कामाचे ३-१३ वाजतात आणि या सगळ्यात हातातला वेळ मात्र निघून जातो. या सगळ्यावर जाणकारांनी सुचवलेला उपाय म्हणजे ‘मनातल्या विचारांची’ कागदावर सुसूत्र पद्धतीत मांडणी करून घेणे.

साधारणपणे मूळ विषयाला केंद्रस्थानी धरून त्यासंबंधीत मुद्यांना बहिर्गामी शाखा म्हणून चिन्हांकीत करण्याच्या चित्रमय पद्धतीला शास्त्रीय परिभाषेत mind-mapping म्हणतात. या तंत्राला शास्त्रीय पद्धतीने अभ्यासून जगापुढे प्रभावीपणे मांडाण्याचं श्रेय जातं ते टॉनी बुझानला. Mind Map हा शब्द टॉनी बुझान नेच वापरलेला आहे आणि त्याचा त्यावर एकाधिकार आहे, अलिकडाच्या काळात पॉप्युलर करण्याच काम टॉनीने केलं असलं तरी या पद्धतीचा वापर अगदीच पारंपारिक आहे.लिओनार्दो-द-विन्सी च्या फेमस नोट्स, भारतीय संस्कृतीमधील अनेक चिन्हे, यंत्रं आदींच्या आकृत्या, ‘रेनासान्स’ कालखंडातील अनेक विद्वानांच्या विचारपद्धती याच तंत्राशी मिळत्या-जुळत्या होत्या/आहेत.

हे mind-mapping पूर्वी हाताने कागदावर केलं जायचं पण आता मात्र कॉम्प्युटरवर अनेक वेगवेगळे प्रोग्रम्स उपलब्ध आहेत. Freemind, XMind हे त्यापैकी चकटफू ( फु्कट ते पौष्टिक !) उपलब्ध आहेत. मला XMind ठिक वाटते.

अबाऊट मी - माईंडमॅप

ऑफिसमधे अनेक छोटे छोटे प्रॉब्लेम्स सोडवताना मी याचा उपयोग करत असतो पण मध्यंतरी इंटर्नेटवर याच्या वैयक्‍तिक कामाकरता कसा उपयोग करता येईल यासंबंधी एक पोस्ट वाचली आणी मी या टूलशी थोडी खेळायला सुरुवात केली. सुरुवातील केवळ गंमत म्हणून माझ्या मनातील अनेक ‘पुढे काय’ यात टाकले आणि वेळोवेळी ते update केले. एव्हाना मात्र मी त्याचा वापर personal todo/GTD या साठी करायला सुरूवात केली आहे. यापूर्वी मी ऑफिस कामात, मिटींगमधे problem presentation, solution analysis साठी वापरतच होतोच. तुम्हाला कदाचित याचा वापर होईल, म्हणून ही नोंद.

जाता जाता सहज माझ्याकडील mind map files जोडत आहे, तुम्हाला शक्य असल्यास / गरज असल्यास वापर करायला हरकत नाही शिवाय या पद्धतीन रिकाम्या वेळात ‘सामाजिक प्रॉब्लेम्स’ वर ब्रेन-स्टॉर्म चालू केल्यास व ते share केल्यास कदाचित एक बराच मोठा knowledge base सुद्धा तयार होऊ शकतो ..

Sheti

शेतीप्रश्न-माईंडमॅप

Related posts:

  1. माईंड मॅप :: सॉफ्टवेअर इंजिनिअरसाठी ( इतरांसाठीही )
  2. ऍरेन्जड् मॅरेज :: स्थळं पहाताना पडलेले प्रश्न
  3. मी माझा धर्म बदलू का ?

Comments

  1. माइंड मॅप फ्री नाही कां? ट्रायल व्हर्शन आहे डाउन लोड साठी .पोर्टर डायमंड वगैरे मार्केटींग टुल्स तर बरेचदा वापरले आहीत.एक्स माइंड ची लिंक मिळेल का डाउन लोड साठी?

    [Reply]

    मी Reply:

    एक्स-माईंड फ़्री डाऊनलोड आहे, मी तोच वापरतो. http://www.xmind.net/downloads/,
    याशिवाय Freemind हे देखील फ्री आहे. आपण लिनक्स वापरत असाल तर http://www.insilmaril.de/vym/ हे टूल देखिल पाहू शकता !

    [Reply]

    Posted by Mahendra

    Link | October 4th, 2009 at 2:24 pm

  2. Thanks Mind Map baddal lekh lihilya baddal.

    Me pan Map Map tool cha vaapar problem solving, goal setting ani eetar goshtinsathi karto.

    mind map karnaya sathi chote ani simple tips aapan jar post keli tar mala tyacha khupcha phayada hoeel.

    Sadya me tony buzan che enlish pustake vachtoy jyamule mala swatala mind map shikata yeil.

    me 5 te 6 mind map softwares vaparato ani shikat asto.
    Once again thanks

    [Reply]

    मी Reply:

    गुरूनाथ,
    माईंडमॅप याविषयावर आणखी थिम रायटींग करण्याचे डोक्यात आहे, लिहायला नक्की आवडेल. याषिवाय मी शेअर केलेले इतर माइंड मॅपस पाहिले का ?

    प्रतिक्रीयेबद्द्ल धन्यवाद.

    [Reply]

    Posted by Gurunath Kajalkar

    Link | November 4th, 2009 at 10:52 am

Leave Your Comment