प्रत्येक आजारपण काहितरी नविन शिकवतं, रोजच्या जगण्याकडे आपण नविन दृष्टीने पहातो,
गरजांचे प्राधान्यक्रम बदलतात, स्वत:चं नगण्यतत्व आणि घरातल्यांचं महत्त्व समजतं ..
आजारपणावर असं बरंच काही लिहिता येईल, ( दुर्गाबाईंनी असं आजारी असतानाच ‘ऋतूचक्र’ पुस्तक लिहिलं म्हणे. )
आणि हो त्यानंतर एक नविन जगणं परत सुरू होतं, हेही महत्त्वाचं.
जानेवारीच्या शेवटच्या दिड आठवड्यात आयोवामधल्या हिमवृष्टीनं कहर केला, त्याच वेळी शरिराने [...]
.. मी बाजूच्या टेबललॅम्पचं बटन सुरू केलं .. त्याच्या प्रकाशात तुझं स्मरणं झालं, कळत नकळत, सगळं जग तुझ्या अस्तित्वा-नस्तित्वासह माझ्यासमोर प्रगट व्हायला सुरूवात झाली .. तू खरंच किती प्रेमळ आहेस रे .. माझा प्रवासाचा त्रास वाचवलास .. अन् ‘तो’ अनुभव मात्र दिलास. आता मला कळतय, मला तू शाळेत का जाऊ दिलं नाहीस .. नाहितर असा [...]
मथाई रिकार्ड चं ‘हॅप्पिनेस’ पुस्तक ऐकत असताना लक्षात राहिलेला गोल्डन रूल म्हणजे – माणसाला मृत्यू, व्याधी, (प्रिय व्यक्तीपासून) विभक्ती आणि अपयश कधीही येऊ शकतं. अर्थात हा नियम लक्षात ठेऊन जर आनंदाने जगायचं ठरवलं तर त्रास कमी होतो .. कारण यातील कोणत्याही वेदनेमधे शारीरिक वेदनेपेक्षा मानसिक वेदनेचाच भाग जास्त असल्याने वरिल नियम त्या सोसण्यासाठी मानसिक तयारी [...]