” एका क्षणावर विजय मिळवून तो साजरा करायची उसंत मिळते तोच पुढचे क्षण नवीन प्रश्न घेऊन ऊभे असलेले आयुष्य खुणावत असते. सर्वसाधारण जगण्याचा प्रवाह ठरलेला, त्या सर्वसाधरण जगण्याच्या प्रवाहाचे टॉलरन्सेसदेखील ठरलेले असतात. मिनिमम टॉलरन्सच्या आसपास जाणारे आयुष्य दुय्यम दर्जाचे वा साधारण मानले जाते तर याच्याच मॅक्स टॉलरन्सने जगले जाणारे उत्तम वा चांगले मानन्याचा समाजग्रह असतो. [...]
जगातील पहिल्या मोडी लिपी फॉन्टची कल्पना मला कशी सुचली आणि तो कसा तयार केला यावर मी गुरूव्हिजनवरील ‘मोडी लिपी फॉन्ट‘ या लेखात लिहिले आहे. (मोडी लिपी फॉन्ट डाऊनलोड साठी तेथूनच जोडणी दिली आहे.) त्यावेळी केवळ गंमत म्हणून तयार केलेल्या फॉन्टचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे अनेक ठिकाणी वापर झाला / होतो आहे. मोडी लिपीसंदर्भात गूगलाई करताना खालील [...]
गेली सात-आठ वर्ष आम्ही दिवाळीत घरी फटाके वाजवणं (विकत घेणंही) बंद केलय. त्याचा परिणाम असा झाला की ‘दिवाळीच्या खर्चातलं फटाक्यांचं बजेट’ पुस्तकखरेदीसाठी वापरलं जाऊ लागलं आणि ‘दिवाळीची पुस्तकखरेदी’ करण्याची प्रथाच चालू झाली. तसं म्हणाल तर पुस्तकं विकत घ्यायला मला कधीच निमित्त लागत नाही, पण तरिही म्हणतात ना ‘पिणार्याला प्यायचा फक्त बहाणाच लागतो ..’ तसंच काहितरी, [...]
अमेरिकेतून भारतात येण्यापूर्वी एका अमेरिकन स्नेह्यांशी भारतीय विवाहपद्धतीवर गप्पा झाल्या. भारतात ऍरेन्जड् मॅरेज म्हणजे नक्की काय असतं आणि त्यात कोणकोणत्या स्टेप्स असतात यावर त्याला त्यावेळी थोडं ‘ब्रिफ’ दिलं होतं.
परवा संध्याकाळी ‘व्हिजुअल थिंकिंग’ करताना याविषयावर चितारलेला डायरीतला एक माईंड मॅप इथे देतोय. जास्त लिहिण्याचा कंटाळा आलाय….
इंग्रजी भाषेत An empty mind is अ devil’s workshop अशी एक म्हण आहे आणि खरोखरच ती खरी आहे, याचा अनुभव मला ‘गोर्या पाण्याच्या’ शिक्षेदरम्यान आला. रिकामं मन जसं सैतान तसच अनेक विचारांनी भरलेलं , अनेक todo मधे अडकलेलं मनही घातकचं, कारण त्यामुळे “एक ना धड भाराभर ..” अशी अवस्था होऊन हातातल्या कामाचे ३-१३ वाजतात आणि [...]