खरं तर शुद्धलेखन हा माझा नेहमीच ‘विक पॉईन्ट’ ठरत आलाय. दहावीला असताना एकदा संस्कृतच्या मास्तरांनी एका परिक्षेत मजबूत मार्क कापले होते, तेव्हा वाईट वाटलं आणि बोर्डाच्या परीक्षेत असं काही होऊ नये म्हणून काहितरी करून मो. रा. वाळंबे यांचं एक पुस्तक मिळवलं, नियम समजून घेतले आणि वेळ मारून ‘न्हेली’. सॉफ्टवेअर इंजिनिअरच्या भाषेत बोलायचें झालंच तर ‘त्या [...]
परवाच बातम्यांमधे वाचलं महाराष्ट्राला ग्लोबल राज्य बनविण्याचं स्वप्न साहेबांनी बोलून दाखवलं. बातमी वाचता वाचता पहिला प्रश्न मनात आला तो म्हणजे ग्लोबल राज्य म्हणजे नक्की काय ? का हा फक्त शब्दछळ आहे ?
गेल्या पन्नास वर्षात खरंतर महाराष्ट्र हे ‘नॅशनल लेवल’ चं राज्य आधीच झालेलं आहे, एके काळी दक्षिणेतल्यांनी आणि आता उत्तरेतल्यांनी नाकी नऊ आणलेत. ‘देशहितासाठी’ आणि [...]