कोणत्याही समस्येवर विचार करताना ती समस्या कागदावर छोट्या छोट्या प्रश्नांच्या स्वरूपात मांडता आली तर त्या छोट्या प्रश्नांवर विचार करणे, उपाय मांडणे सोपे जाते. तसेच समस्येचा आवाका [विस्तार] समजून घ्यायला सोपे जाते. या नियमानुसार शेतीसमस्या म्हणजे नक्की कोणती समस्या आहे, याचा आढावा घेऊया.
माईंडमॅपमधे दाखवल्याप्रमाणे आजची शेती समस्या म्हणजे केवळ एक प्रश्न नसून अनेक प्रश्नांचे तयार झालेले [...]
” मी माझ्या छोट्या मुलीसाठी काय करू शकतो ? तिला काय चांगलं देता येईल ? ”
भारतातल्या ऑनलाईन भेटलेल्या एक ज्येष्ठ मित्रांनी चॅट करताना हा प्रश्न विचारला.
खरंतर आजकालच्या धकाधकीच्या जगण्यामधे असा विचार मनात येत असेल तर मी म्हणेन तुम्ही आणि तुमची मुलं भाग्यवान आहात.
आपली पिढी नाही म्हटलं तरी तसे सोनियाचे दिवस अनुभवतेय. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दोन [...]
‘भारत हा कृषीप्रधान देश आहे’ असा विचार प्रत्येकाच्या मनात बिंबवण्यामधे आपली शिक्षणव्यवस्था नक्कीच यशस्वी झाली आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेचा, समस्यांचा लेखाजोखा मांडताना शेतकरी हा प्रधान घटक मानला जातो यात काही शंकाच नाही. आयटी कंपनीच्या ऑफिसमधे क्युबिकलमधून, सरासरी प्रत्येक ‘टिम-मेट’ची गावाकडे नक्कीच शेती असते, तिकडे आई-बाबा किंवा ‘चुलते’ बघतात. एकंदर भारत हा कृषीप्रधान देश आहे हे बिंबवण्यासाठी [...]
माझ्या एका डायरीतील सुरूवातील लिहिलेल्या ‘जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा हा व्यर्थ भार विद्येचा’, या ओळी माझ्यातल्या रिकामटेकड्या अनॅलिस्टला नेहमीच चॅलेज देतात, अशाचवेळी कधीतरी ड्राफ्ट केलेला हा मॅप ..
आज थोडा उशीर झालाय यावर लिहिण्याचं काम पुन्हा कधीतरी, पण तोपर्यंत तुम्ही हा माईंड मॅप पाहून आपले अभिप्राय, प्रतिक्रीया, प्रश्न जरूर लिहा.
गल्लीबोळातून शोधत शोधत मी त्या पडक्या वाड्यापाशी पोचलो.
दार उघडून तो समोर आला काहीश्या प्रश्नार्थक मुद्रेने माझ्याकडे पहात असताना, त्याने काही विचारण्यापूर्वीच मी सांगून टाकलं,
“मला प्रोग्रामिंग शिकायचय, तुझ्याकडे वेळ आहे ना ? आणि तुझी फिज किती ?”,
तो थोडासा हसला मला आत बोलावलं आणि, काहिशा गंभीर स्वरात तो म्हणाला,
“मी प्रत्येकालाच प्रोग्रामिंग शिकवतो असं नाही, त्यासाठी तुला एक [...]