जानेवारीनंतर उबन्टू लिनक्स वापरण्याचा केलेला प्रयत्न चांगलाच यशस्वी झालाय. गेल्या पाच महिन्यात मी विन्डोज केवळ गुगल व्हिडिओ चॅटसाठी वापरल. त्याशिवाय वापरण्याची कधी गरज पडली नाही किंवा वेळहीआली नाही. गेले काही दिवस उबन्टू १०.०४ ची चर्चा ऐकून काल एकदाच ट्रायल म्हणून हार्डडिस्कवर एका बाजूला उबन्टू १०.०४ टाकलं, फर्स्ट इंप्रेशन तर जबरदस्त आहे. मला आवडलेल्या गोष्टींची ठळक [...]
गेल्या पंधरा दिवसात मी ब्लॉग लिहिला नाही, मंदार आणि मीनलने खो दिला, पण त्यांच्या प्रश्नांना उत्तरं देता आली नाहीत, त्याचं एक कारण म्हणजे , मी काम करत होतो, माझा लिनक्स लॅपटॉप सुसज्ज करण्याचं !
सुमारे चार वर्ष मी पूर्णवेळ मायक्रोसॉफ्ट विन्डोज ही ऑपरेटींग सिस्टम (केवळ ना विलाजास्तव ..) वापरतोय, कार्यालयीन कामकाजासाठी विन्डोजचाच वापर असतो, परंतु हवा [...]
रेडहॅट ७.२ हे पहिलं लिनक्स (माझ्यासाठी पहिलं) शिरीष सरांनी सासवडला माझ्या घरी येऊन मशिनवर टाकलं तेव्हा ते वापरताना मला आभळ ठेंगणं झालं होतं. त्यावेळी माझं जग डॉसचा काळापांढरा स्क्रीन आणि विन्डोज-९८ याभोवतीच रेंगाळत होतं. मिलेनियम आणि २००० ही चैन होती, गावात क्वचीत कुणाकडे तरी ती पहायला मिळायची. ( हो, विन्डोज मिलेनियम नावाची ओएस [...]