• करियर :: प्रॉब्लेम फाईन्डर की सोल्यूशन प्रोव्हाईडर ?

    कॅम्पस इंटरव्यूव च्या तयारीने जोर धरला होता, पुढे काय ही‌ दिशा आता नक्की‌ करायला पाहिजे होती. एका क्लासमेटने माझ्या डोक्यात सर्टीफिकेशनचं खूळ घातलं , त्यावर काय करता येईल याच विचारात मी होतो. ‘त्याच्याकडे’ त्यादिवशीचा लेसन संपल्यावर मी थांबलो , आणि त्याला मी‌ ‘पुढे काय करू ?‘ अशा आशयाचा प्रश्न विचारला, माझ्यापुढे काही पर्याय होते -
    १. [...]

  • सॉफ्टवेअर-प्रोग्रामिंग :: एक श्रद्धा !

    पर्णपाचू सावळा सावळा |
    विठ्ठल माझा मळा, मी वारकरी आंधळा ||
    त्यादिवशी‌ सकाळी सकाळी थोडा लवकरच मी ‘त्या’च्याकडे गेलो, तर ‘भालू’मधलं हे त्याचं आवडतं गाणं त्याने त्याच्या पीसी वर लावलं होतं आणि स्वारी मजेत खापरी पाटिवर पेन्सिलने काहितरी‌ लिहित होती. त्याला मी कधीच देवपूजा करताना किंवा साधे हात जोडताना सुद्धा पाहिला नव्हता, तरी एवढी‌ तल्लिनता पाहून मी [...]

  • गणपती आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट !

    त्यावेळी असाच गणेशोत्सव सुरू होता.
    पंधरा मिनिटं मला एकच प्रॉब्लेम घेऊन बसलेलं बघून शेवटी ‘तो’ आलाच.
    वहीच्या पानावर मी तीन व्हेरीएबल्स आणि एक for लूप लिहिला होता पण तरीही मी संपूर्ण ‘स्युडो कोड’ लिहिण्यापासून बराच दूर होतो,
    खरंतर मला सुरूवात कशी करायची हेच समजत नव्हतं आणि मी त्या प्रश्नावर विचार करायचा सोडून दिला होता.
    माझ्याकडे बघत हसत हसत त्यानं [...]

  • पहिला धडा !

    गल्लीबोळातून शोधत शोधत मी त्या पडक्या वाड्यापाशी पोचलो.
    दार उघडून तो समोर आला काहीश्या प्रश्नार्थक मुद्रेने माझ्याकडे पहात असताना, त्याने काही विचारण्यापूर्वीच मी सांगून टाकलं,
    “मला प्रोग्रामिंग शिकायचय, तुझ्याकडे वेळ आहे ना ? आणि तुझी फिज किती ?”,
    तो थोडासा हसला मला आत बोलावलं आणि, काहिशा गंभीर स्वरात तो म्हणाला,
    “मी प्रत्येकालाच प्रोग्रामिंग शिकवतो असं नाही, त्यासाठी तुला एक [...]

  • कोडींग बिटवीन द लाईन्स !

    Reading between the lines हे जसं समिकरण असतं त्याचप्रमाणे,
    Coding between the lines हेही तुला समजलं पाहिजे !
    आज चौथा पाठ शिकवायला सुरूवात करताना त्याने पहिलच वाक्य उच्चारलं,
    “तुला माहित आहे का, पाणी सुद्धा चढू शकतं, पिणारा फक्‍त अट्टल नशेबाज हवा आणि अगदी तसंच लिहिलेल्या code ची प्रत्येक लाईन Mantra होऊ शकते, लिहिणारा फक्‍त बुद्धाच्या एकाग्रतेचा हवा !!”