… मूर्त पेक्षा अमूर्त रंग-रेषा ही तेवढाच आनंद देतात. चित्र काढताना बाकिचं सगळ विसरलं जातं, रंग-रेषा-मिकचा कागद .. आणि आनंदच आनंद .. एक रंगित मेडिटेशन ! खरच काय बरं संबंध आहे वृत्तींचा आणि रंगांचा ? वृत्तींना रंग असतो का ? रंगाच्या वृत्ती असतात का ? मनाच्या बहिर्मुखतेला अंतरंगात डोकवायला लावायच सामर्थ्य रंगात आहे, म्हणून तर [...]
डिझास्टर मॅनेजमेन्ट हा कोणत्याही व्यवसायाचा अविभाज्य घटक झालेला आहे, त्या अनुषंगाने कंपन्यांच्या डिझास्टर मॅनेजमेन्ट पॉलिसीज देखील असतात, यामधे भूकंप, आग आदी संकट आल्यास कंपनीचे नुकसान कसे टाळता येईल व व्यवसाय कसा सुरू राहिल अशी मार्गदर्शक तत्व असतात व त्यानुसार संकटातदेखील तग धरता येते. जर कंपनीचा असा प्लॅन असतो तर आपल्या स्वत:साठी का नाही ? मनाला [...]
आपली भाषा अस्थिर होतेय, आपल्या भाषेला बाकिचे दुय्यम लेखतायत, आपल्या भाषेची (आणि भाषिकांचीही) गळचेपी होतेय .. असे एक ना अनेक सूर आज आपल्याला ऐकायला मिळतायत, कदाचित तुम्हीही हेच रडगाणं गात असाल. सांखिकीच्या, सामाजिक मान्सशास्त्राच्या, इतिहासाच्या किंवा राजकारणाच्या दृष्टिकोनातून काय सत्य आहे हे पडताळण्याची गरज असेलही, पण एक मात्र नक्की … हे सगळे गळे मराठी बोलणारेच [...]
मराठी दिनानिमित्त मनामधे जे काही चाललं होतं त्याला आज बत्ती लागली. बोलण्याच्या ओघात एकाने री ओढली आणि राजकारण्यांमुळे मराठी भाषेचं कसं खच्चीकरण होतय यावर एक झकास भाषण दिलं. केवळ राजकारण हे कोणत्याही भाषेच्या प्रगतीला जर कारण होऊ शकत नसेल तर ते अधोगतीलाही नसले पाहिजे असं माझं मत आहे, .. त्या भाषेमधे जर अर्थकारण होत नसेल, [...]
.. मी बाजूच्या टेबललॅम्पचं बटन सुरू केलं .. त्याच्या प्रकाशात तुझं स्मरणं झालं, कळत नकळत, सगळं जग तुझ्या अस्तित्वा-नस्तित्वासह माझ्यासमोर प्रगट व्हायला सुरूवात झाली .. तू खरंच किती प्रेमळ आहेस रे .. माझा प्रवासाचा त्रास वाचवलास .. अन् ‘तो’ अनुभव मात्र दिलास. आता मला कळतय, मला तू शाळेत का जाऊ दिलं नाहीस .. नाहितर असा [...]